आता ‘या’ चार कारणांमुळे रेशन कार्ड होणार रद्द, रेशनकार्डचे नवे नियम सरकारकडून जारी; जाणून घ्या पटापट नाहीतर…
आर्थिकृष्ट्या सक्षम असूनही मोफतचं रेशन घेणाऱ्यांसाठी सावधान करणारी एक बातमी आहे. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही मोफत रेशन घेत असाल तर आताच तुमचं रेशन कार्ड रद्द करा. नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
नवी दिल्ली : रेशन कार्डधारकांसाठी एक बातमी आहे. केंद्र सरकारकडून लाखो रेशन कार्डधारकांना मोफत रेशन दिलं जातं. सरकारने या वर्षीही म्हणजे 2023मध्येही रेशन कार्डधारकांना मोफत रेशन देण्यात येणार असल्याचं सरकारने जाहीर केलं होतं. मात्र, अपात्र लोकही मोफत रेशनचा फायदा घेत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात येत आहे. जे लोक अपात्र आहेत आणि तरीही मोफत रेशन घेत आहेत, अशा लोकांनी स्वत: आपलं रेशन कार्ड रद्द करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. जर लोकांनी स्वत:हून रेशन कार्ड रद्द नाही केलं तर त्याची सत्यता तपासल्यानंतर अन्न पुरवठा विभागाची टीम रेशन कार्ड रद्द करणार आहे. अशा लोकांविरोधात कारवाईही केली जाऊ शकते.
नवा सरकारी नियम काय?
जर रेशन कार्डधारकाने स्वत:च्या उत्पन्नातून 100 वर्गमीटरचा प्लॉट, फ्लॅट किंवा घर खरेदी केली असेल, त्याच्याकडे चार चाकी गाडी, ट्रॅक्टर असेल, शस्त्राचं लायसन्स असेल, गावात वर्षाला दोन लाख आणि शहरात तीन लाखाहून अधिक पगार असेल अशा लोकांना त्यांचं रेशन कार्ड तहसील किंवा डीएसओ कार्यालयात सरेंडर करावं लागणार आहे. या चार गोष्टींपैकी एका जरी गोष्टीत दोषी आढळल्यास रेशन कार्डधारकाचे रेशन कार्ड तर रद्द होईलच पण त्याच्यावर कारवाईही केली जाणार आहे.
कायदेशीर कारवाई होणार
नव्या सरकारी नियमानुसार जर रेशन कार्डधारकाने स्वत:हून कार्ड सरेंडर केलं नाही तर चौकशीनंतर त्याचं कार्ड रद्द केलं जाईल. तसेच त्याच्या कुटुंबीयांविरोधात कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढेच नाही तर जेव्हापासून हे लोक रेशन घेत आहेत, तेव्हापासूनची त्यांच्याकडून भरपाईही केली जाणार आहे.
केंद्र सरकारने अत्यंत कडक नियम केले आहेत. त्यामुळे रेशन कार्डधारकांनी या नियमांचं पालन केलं पाहिजे. ज्यांची आर्थिक क्षमता आहे. त्यांनी मोफतमध्ये रेशन घेऊ नये. रेशनिंग व्यवस्था ही गोरगरीबांसाठी आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनी रेशन कार्ड रद्द केलं तर त्याचा फायदा इतर गरीबांना होणार आहे, असं सांगितलं जात आहे.