Income Tax : हे काम केले का? मग ITR भरण्याचा उपयोग काय
Income Tax : आयकर खात्याने कोट्यवधी करदात्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. आयकर विभागानुसार तुम्ही ITR संबंधी हे कामे त्वरीत केली नाही तर ITR अवैध, रद्दबातल, इनव्हॅलिड तर होईलच, पण तु्म्हाला रिफंड मिळण्यात ही अडचण येईल.
नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : देशात यंदा आयटीआर भरणाऱ्यांनी (ITR Taxpayers) जोरदार प्रतिसाद दिला. उत्तर भारतासह इतर भागात पावसाने हाहाकार माजविलेला असतानाही, अडथळ्यांची शर्यत पार करुन आयटीआर भरण्यात आला. यावर्षी जवळपास 6 कोटी करदात्यांनी ITR फाईल केला आहे. पण निव्वळ आयटीआर भरुन भागत नाही. केंद्र सरकार (Central Government) आयटीआर प्रक्रिया साधी सरळ सोपी करण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात कदाचित आयटीआर भरण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल पण पाहायला मिळतील. पण सध्या प्राप्तिकर विभागाने करदात्यांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, आयटीआर संबंधित कामे त्वरीत केली नाही तर ITR अवैध, रद्दबातल (Invalid) होईल. पण करदात्यांना रिफंड मिळण्यात पण अडचण येऊ शकते.
प्राप्तिकर खात्याने दिला अलर्ट
आयकर खात्याने त्यांच्या ट्विटर, एक्स हँडलवरुन याविषयीचा अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, करदात्यांनी आयटीआर जमा केल्यानंतर ई-फायलिंग पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी काय प्रक्रिया हे पण खात्याने स्पष्ट केले आहे. ही प्रक्रिया, आयटीआर फाईल केल्यानंतर 30 दिवसांच्या आत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे आयकर खात्याने स्पष्ट केले आहे. उशीर झाल्यास करदात्यांना दंडाचा फटका बसतो.
Dear Taxpayers,
Complete the e-filing process today!
Please find below the modes of e-verification of return. Remember to verify your ITR within 30 days of filing. Delayed verification may lead to levy of late fee in accordance with provisions of the Income-tax Act, 1961.… pic.twitter.com/bu7jrXLFNH
— Income Tax India (@IncomeTaxIndia) August 26, 2023
ई-व्हेरिफिकेशन कशासाठी ?
आयकर विभागाने नियमानुसार, आयकर रिटर्न जमा केल्यानंतर ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ITR फायलिंगनंतर ही प्रक्रिया पुढील 30 दिवसांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. जर तुम्ही जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ITR रिटर्न फाईल केले असेल तर ई-व्हेरिफिकेशनची मर्यादा जवळ आली आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर आयटीआर Invalid मानण्यात येते. दंडासह आयकर रिटर्न पुन्हा दाखल करावा लागू शकतो.
असे करा ई-व्हेरिफिकेशन?
- e-verification साठी आयटी विभागाने पाच प्लॅटफॉर्म जसे बँक खाते, नेट बँकिंग, बँक एटीएम, आधार वा डीमॅट खात्याचा पर्याय दिला आहे.
- ई-व्हेरिफिकेशन पूर्ण करण्यासाठी सर्वात अगोदर आयकर खात्याच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या.
- त्यानंतर तुमचा पॅन क्रमांक आणि पासवर्ड नोंदवा.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला लागलीच ई-व्हेरिफिकेशनचा पर्याय समोर दिसेल.
- नेट बँकिंग, बँक एटीएम, आधार, डीमॅट खाते वा बँकेचे खाते यांच्यापैकी एक पर्याय निवडा.
- जर आधार हा पर्याय निवडला असेल तर त्यासंबंधीच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठविण्यात येईल.
- यानंतर ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.