AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax : आता उरले दिवस कमी, ITR भरला की नाही, नाही तर ठेवा तुरुंगात जाण्याची तयारी

Income Tax : काय सांगताय, अजूनही इनकम टॅक्स रिटर्न भरला नाही. साधारणपणे दहा दिवस तुमच्या हातात उरले आहे. हा नियम तर तुम्ही वाचालाच असेल? त्यानुसार, अशा करदात्यांना तुरुंगाची हवा खावी लागू शकते..

Income Tax : आता उरले दिवस कमी, ITR भरला की नाही, नाही तर ठेवा तुरुंगात जाण्याची तयारी
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 8:47 AM

नवी दिल्ली | 18 जुलै 2023 : आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याची (ITR Filing) अंतिम मुदत आता अगदी जवळ येऊन ठेपली आहे. यंदा अंतिम मुदत (Deadline) वाढवणार नसल्याची घोषणा केंद्रीय अर्थखात्याने केली आहे. प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै ही आहे. अजूनही कोट्यवधी करदात्यांनी (Taxpayers) त्यांचे आयटीआर फाईल केलेले नाहीत. त्यांना अजून कामातून सवड मिळालेली नाही. पण ही सबब तुरुंगवारी घडवू शकते, याची अनेकांना कल्पनाच नाही. नियम माहिती नसल्याने अथवा सबकुछ चलता है, अशा मानसिकतेमुळे अनेक जण वेळेवर आयटीआर भरण्याची कवायत करतात. पण कधी कधी हा आळस चांगलाच नडू शकतो.

नियम सांगतो तरी काय?

आयटीआर वेळेच्या आत भरणे आवश्यक आहे. नाही तर त्याचा फटका बसतो. तुम्हाला अनेक प्रकारच्या लाभापासून वंचित रहावे लागते. अंतिम मुदतीनंतर आयटीआर भरणाऱ्यांना दंड भराव लागतो. तुमच्या आयटीआरच्या प्रकृतीनुसार दंडाची रक्कम मागेपुढे होईल. एवढंच कशाला तुम्हाला फुकटात तुरुंगवारी पण घडू शकते. आयटीआर फाईल करण्यासंबंधी प्राप्तिकर खात्याचे नियम आहेत. त्याचे पालन करणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

इतक्या जणांचा समजदारपणा

प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळानुसार, यंदा, आतापर्यंत जवळपास 3 कोटी करदात्यांनी आयटीआर फाईल केले आहेत. गेल्यावर्षी हा आकडा 5.50 कोटींहून अधिक होता. म्हणजे गेल्यावर्षीपेक्षा अनेक करदाते आळसावले आहेत. त्यांना कर भरण्याची अजून सवड मिळाली नाही. जवळपास 2.50 कोटींहून अधिक करदात्यांनी आयटीआर फाईल केले नाही. 31 जुलै ही अंतिम मुदत आहे. यादरम्यान त्यांना रिटर्न फाईल करणे बंधनकारक आहे. पण ही मुदत चुकली तर त्याचा आर्थिकच नाही तर इतर ही फटका बसतो.

डिसेंबरपर्यंत भरता येईल रिटर्न

इनकम टॅक्स डिपार्टमेंट, करदात्यांना उशीरा आयटीआर भरण्याची सुविधा देते. हा बिलेटेड आयटीआर, म्हणजे विलंब आयटीआर भरण्याची किंमत मोजावी लागते. आयकर अधिनियम, 1961 चा नियम 139 (4) अंतर्गत याची व्याख्या करण्यात आली आहे. अंतिम मुदतीनंतर भरण्यात येणाऱ्या प्राप्तिकर रिटर्नला बिलेटेड रिटर्न असे म्हणतात.

बिलेटेड रिटर्नचा कालावधी किती

सध्याचे मुल्यांकन वर्ष समाप्त होण्यापूर्वी अथवा मुल्यांकन वर्ष (Assessment Years) पूर्ण होण्यास 3 महिन्यांचा कालावधी उरला असताना, विलंब प्राप्तिकर रिटर्न, बिलेटेड आयटीआर भरता येतो. आर्थिक वर्ष 2022-23 म्हणजे मुल्यांकन वर्ष 2023-24साठी 31 डिसेंबर 2023 रोजीपर्यंत बिलेटेड रिटर्न दाखल करता येते. म्हणजे इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर पुढील पाच महिन्यात विलंब आयटीआर भरता येतो.

कितीचा आर्थिक दंड

आयकर नियमानुसार, करदात्याला 31 जुलैपर्यंत आयटी रिटर्न दाखल करणे आवश्यक आहे. या कालावधीत करदात्याने कर रिटर्न भरला नाही तर त्याला विलंब आयटीआर भरता येतो. त्यासाठी त्याला विलंब शुल्क भरावे लागते. 5 लाख रुपयांपेक्षा विलंब शुल्क 5,000 रुपये भरावे लागेल. तर ज्यांचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांना 1,000 रुपयांपेक्षा अधिकचे शुल्क आकारण्यात येते.

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....