Income Tax : तुम्ही पण करताय का हीच चूक? कर वाचविण्यासाठी करताय गुंतवणूक

Income Tax : कर सवलतीचा फायदा घेण्यासाठी आपण धडाधड गुंतवणूक करतो. पण एक फायदा घेण्यासाठी तुम्ही नुकसान तर करुन घेत नाहीत ना, याकडे कोणीच लक्ष देत नाही. कर सवलतीसाठी इतर काही पर्यायांचा तुम्ही विचार करु शकता. गुंतवणुकीसाठी योग्य नियोजन सर्वात आवश्यक आहे.

Income Tax : तुम्ही पण करताय का हीच चूक? कर वाचविण्यासाठी करताय गुंतवणूक
Follow us
| Updated on: Sep 03, 2023 | 5:06 PM

नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : प्रत्येकाला वाटते की त्याच्या कमाईतून काही रक्कम भविष्यासाठी गुंतवावी. आताची बचत भविष्यातील तरतूद असते, असे म्हणतात. त्यामुळे अनेक जण विविध योजनेत, विम्यासाठी ही रक्कम (Investment) गुंतवतात. कमाईवर कर लागतो. कर पात्र रक्कमेवर कर आकारण्यात येतो. कर वाचावा, कर सवलतीसाठी अनेक जण गुंतवणूक करतात. पण केवळ कर वाचविण्यासाठी (Income Tax) केलेली ही गुंतवणूक तोट्याची पण ठरू शकते. याकडे वेळीच कोणीच लक्ष देत नाही. गुंतवणूक होते. परतावा मिळतो आणि कर पण वाचतो, असे साधे गणित असते. पण त्यातून नुकसान होते याकडे कोणची लक्ष देत नाही. त्यासाठी गुंतवणुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे.

मग काय करावे ते तर सांगा

तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर सर्वात अगोदर ही गुंतवणूक कशासाठी करताय, ते स्पष्ट होऊ द्या, म्हणजे ही रक्कम कशासाठी उपयोग ठरणार हे लक्षात घ्या. प्रत्येक गुंतवणुकीमागे काही तरी हेतू, उद्देश असतो. काही लक्ष्य असते. भविष्यातील तरतूद असते. त्यानुसार गुंतवणूक योजना निवडण्यात येते. तिचा कालावधी निवडण्यात येतो.

हे सुद्धा वाचा

कर बचतीसाठी गुंतवणूक करु नका

तुमचा खर्च अधिक असेल तर केवळ कर वाचविण्यासाठी तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करत असाल तर ते चुकीचे ठरु शकते. तुम्हाला ही गुंतवणूक चणचण आणू शकते. तसेच त्यातून दीर्घकालीन अपेक्षित परतावा पण मिळणार नसेल तर दोन्हीकडून तुमचा तोटा होतो. कारण कर बचतीच्या अनेक योजना या दीर्घकालीन असतात. त्यामुळे कर बचतीसाठी सजग राहणे आवश्यक आहे.

तर होते नुकसान

पीपीएफ, सुकन्या समृद्धी, एनपीए अशा योजनांमध्ये काही खास परिस्थितीच तुम्हाला रक्कम काढता येते. पीपीएफ आणि एफडीमध्ये तर 5 वर्षांपर्यंत रक्कम काढता येत नाही. तुम्ही वेळेपूर्वी रक्कम काढली तरी तुम्हाला परताव्यावर कमी व्याजदर मिळतो. हे एक प्रकारे तुमचे नुकसान ठरते.

शेअर बाजार-म्युच्युअल फंड

शेअर बाजाराचा अभ्यास असेल अथव ट्रेडिंगचे ज्ञान असेल तर ही गुंतवणूक फायदेशीर ठरते. तुम्ही इंट्राडे अथवा दीर्घकालीन गुंतवणूक करु शकता. म्युच्युअल फंड हा पण चांगला पर्याय आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास 15-20 टक्के चांगला परतावा मिळतो. तर शेअर बाजारात तुमच्या अक्कलहुशारीने पैसा कमावता येतो. कर बचत योजनांमधून तुम्हाला केवळ 7-10 टक्केच परातवा मिळू शकतो. त्यामुळे केवळ कर वाचविण्यासाठी नुकसानीचा सौदा करता कशाला, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

या आहेत कर बचत योजना

  1. सध्या बाजारात अनेक टॅक्स सेव्हिग योजनांचे पर्याय उपलब्ध आहेत.
  2. पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PPF)
  3. नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS)
  4. सुकन्या समृद्धि योजना (SSY)
  5. ज्येष्य नागरिक बचत योजना (SCSS)
  6. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS)
  7. 5 वर्षांसाठीची कर बचत मुदत ठेव योजना

Non Stop LIVE Update
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा.