Income Tax : अरे देवा, चुकीची माहिती भरली? किती वेळा करता येते ITR मध्ये दुरुस्ती

Income Tax : प्राप्तिकर रिटर्न भरण्यासाठी अनेकांची झुंबड उडाली आहे. पण आयटीआर भरण्याच्या गडबडीत काहींकडून चुका पण होतात. या चुका दुरुस्त करता येतात का, किती वेळा आयटीआरमधील चुकीची दुरुस्ती करता येते.

Income Tax : अरे देवा, चुकीची माहिती भरली? किती वेळा करता येते ITR मध्ये दुरुस्ती
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 5:19 PM

नवी दिल्ली | 22 जुलै 2023 : इनकम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करण्याची अंतिम मुदत आता जवळपास आली आहे. 31 जुलै ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर विलंब शुल्कासह दंड भरावा लागू शकतो. प्राप्तिकर रिटर्न भरण्यासाठी अनेकांची झुंबड उडाली आहे. आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढविण्याची विनंती करण्यात आली आहे. पण त्यावर अजूनही अर्थमंत्रालयाने उत्तर दिलेले नाही. मुदत वाढविण्यात येणार नाही, असे यापूर्वीच मंत्रालयाने स्पष्ट केले होते.  पण आयटीआर भरण्याच्या गडबडीत काहींकडून चुका पण होतात. मग या चुका कशा दुरुस्त कराव्यात (Mistake While Filing ITR) असा प्रश्न त्यांना पडतो. काही करदात्यांना तर चुका दुरुस्त करता येत नाही, असे वाटते. पण तसे नाही. करदात्यांना ही माहिती दुरुस्त करता येते. किती वेळा आयटीआरमधील चुकीची दुरुस्ती करता येते, माहिती आहे का?

किती दिवसांत करता येते दुरुस्ती

आयटीआरमध्ये दुरुस्ती करता येते. आयटीआर फाईल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. याचा अर्थ असा नाही की, अंतिम मुदतीनंतर तुम्हाला दुरुस्ती करता येत नाही. प्राप्तिकर विभागाच्या नियमानुसार, तुम्हाला त्यानंतरही दुरुस्ती करता येते. आयटीआर फाईल करताना चुकीची माहिती दिल्यास ती दुरुस्त करता येते. मूल्यांकन वर्ष समाप्तीपूर्वी अथवा मूल्यांकन वर्ष पूर्ण होण्याच्या तीन महिन्यापर्यंत आयटीआर रिव्हाईज करता येते.

हे सुद्धा वाचा

ऑनलाईन कसे करावे ITR फाईल

आयकर खात्याने करदात्यांना ऑनलाईन इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी, ई-फाईलिंगसाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. त्यासाठी https://www.incometax.gov.in/iec / foportal वर लॉग इन करावे लागेल. तुम्हाला ऑनलाइन आईटीआर फाईल करु शकता.

ई-फाईलिंगचा फायदा काय?

आयकर विभागाने ई-रिटर्नसाठी आणि रिटर्न ऑनलाईन स्वरुपात फाईल करण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. ही सेवा मोफत आहे. करदात्याला स्वतः आयटीआर भरता येत असेल तर करदाता सहज रिटर्न फाईल करु शकतो. https://www.incometax.gov.in/iec/ foportal पोर्टलवर त्याला ई-फाईलिंग करता येते.

ई-फायलिंग आणि ई-पेमेंटमध्ये अंतर काय

ई-पेमेंट टॅक्स ही ऑनलाईन कर भरण्याची सुविधा आहे. नेट बँकिंग वा एसबीआयच्या डेबिट, क्रेडिट कार्डच्या मदतीने कर भरणा करता येतो. तर ई-फायलिंग इनकम टॅक्स रिटर्न ऑनलाईन पद्धतीने फाईल करता येतो.

31 जुलैनंतर रिटर्न करता येतो का फाईल?

31 जुलैनंतर प्राप्तिकर रिटर्न फाईल करता येतो. पण त्यासाठी अधिक खर्च येईल. तुम्हाला विलंब शुल्कासह 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न फाईल करता येईल. जर तुमची एकूण कमाई 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. तर तुम्हाला 1,000 रुपये विलंब शुल्क द्यावे लागेल. तर एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर विलंब शुल्क 5,000 रुपये असेल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.