निर्मला सीतारामन संतापल्या, इन्फोसिसच्या CEO ना धाडलं समन्स, अवघ्या काही तासांत टॅक्स पोर्टल सुरु

Income Tax Portal | या सगळ्या घडामोडींनंतर अवघ्या काही तासांमध्ये इन्फोसिसकडून टॅक्स पोर्टल सुरु झाल्याचे जाहीर करण्यात आले. या पोर्टलमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत आणि आता हे पोर्टल सुरु झाले आहे.

निर्मला सीतारामन संतापल्या, इन्फोसिसच्या CEO ना धाडलं समन्स, अवघ्या काही तासांत टॅक्स पोर्टल सुरु
आयकर पोर्टल
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 9:53 AM

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाच्या नव्या पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे सुरु असणारा सावळागोंधळ संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डोळे वटारल्यानंतर इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना खडबडून जाग आली. त्यानंतर काही तासांमध्येच Income Tax Portal व्यवस्थितपणे कार्यरत झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून Income Tax Portal ठप्प होते. आयकर विभागाने शनिवारी ट्विट करुन तशी माहितीही दिली होती. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला होता. नी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सलील पारेख यांना समन्स बजावत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सोमवारी सलील पारेख यांना निर्मला सीतारामन यांच्यासमोर हजर व्हावे लागणार आहे.

या सगळ्या घडामोडींनंतर अवघ्या काही तासांमध्ये इन्फोसिसकडून टॅक्स पोर्टल सुरु झाल्याचे जाहीर करण्यात आले. या पोर्टलमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत आणि आता हे पोर्टल सुरु झाले आहे. करदात्यांना आतापर्यंत सहन कराव्या लागलेल्या गैरसोयीसाठी क्षमस्व आहोत, असे इन्फोसिसच्या ट्विटमध्ये म्हटले होते.

काही दिवसांपूर्वीच निर्मला सीतारामन यांनी पोर्टलवरील तांत्रिक बिघाड येत्या दोन ते तीन आठवड्यात दुरुस्त होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, आता त्यांनी थेट इन्फोसिसच्या सीईओनाच धारेवर धरल्याने पुढे काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यापूर्वी इन्फोसिस कंपनीने ऑगस्ट महिन्यापासून Income Tax पोर्टल व्यवस्थित कार्यरत होईल, असे म्हटले होते. मात्र, आता पंधरवडा उलटूनही या पोर्टलमधील तांत्रिक बिघाड काही केल्या संपायचे नाव घेत नाहीत. परिणामी करदात्यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आयकर परतावा (Income Tax Return) आणि फॉर्म 16 भरण्याची अंतिम मुदत पुढे ढकलली होती.

7 जूनला सुरु झाले होते पोर्टल

www.incometax.gov.in हे पोर्टल 7 जूनपासून सुरु झाले होते. कर भरतानाची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले होते. मात्र, या नव्या पोर्टलचा वापर करताना करदात्यांना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. या पोर्टलवरील अनेक सुविधा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. त्याठिकाणी केवळ COMING SOON असा मेसेज दाखवला जात आहे.

संबंधित बातम्या:

Income Tax लाँच करणार नवीन पोर्टल, करदात्यांसाठी कोणती सुविधा?

Income Tax Portal: इन्फोसिसने तयार केलेल्या नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटी; अर्थमंत्रालयाने बोलावली बैठक

Income Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.