Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताय, करसवलत मिळवण्यासाठी काय करायचं? वाचा सविस्तर

करातून सुट मिळवण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्यानं अनेकदा कर सवलतीचा लाभ घेता येता नाही. Income Tax Return

Income Tax Return:  इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताय, करसवलत मिळवण्यासाठी काय करायचं? वाचा सविस्तर
आयकर विभाग
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 7:29 PM

नवी दिल्ली: इन्कम टॅक्स असो की आणखी दुसरा कर असो नागरिकांना त्यातून सूट मिळावी, असं वाटतं असतं. अनेकदा करातून सूट मिळवण्यासाठी कागदपत्रे सादर करणे, अडचणीचे होऊन बसते. करातून सुट मिळवण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्यानं अनेकदा कर सवलतीचा लाभ घेता येता नाही. नोकरी करणारे अनेकजण त्यांच्या गुंतवणुकीची माहिती त्यांच्या कंपनीला देत नाहीत. त्यामुळे ई फायलिंग करताना कर बचतीचा फायाद मिळत नाही. मात्र, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचं काम सोपं झालेलं आहे. त्यामुळे करबचत करण्यासाठी काही गोष्टींचा वापर केल्यास याचा तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. (Income Tax Return how to take benefit from tax saving rules check here)

5 वर्षांची मुदत ठेव

कर बचत करण्यासाठी पहिला मार्ग म्हणजे तुम्ही 5 वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेव ठेऊ शकता. या ठेवीवर तुम्हाला करसवलत मिळेल.

टर्म लाईफ इन्शुरन्स पॉलिसी

टर्म लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर देखील तुम्ही करसवलत मिळवू शकता. टर्म लाईफ इन्शुरन्स पॉलिसीद्वारे कोणताही व्यक्ती त्याच्या मृत्यूनतंरच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करु शकतो. ही पॉलिसी ठराविक काळासाठी काढली जाते. टर्म लाईफ इन्शुरन्स पॉलिसी इन्कम टॅक्सच्या 80C अंतर्गत विमा धारकाला सूट मिळते. तर, क्लेम अमाऊंटवर 10(10D) नुसार 100% सूट मिळते. 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक लाईफ इन्शुरन्स प्रीमियमवर इन्कम टॅक्स 1961चा नियम 80 सी नुसार सूट मिळते.

गृहकर्जाच्या मुद्दलावर सूट

करदात्यांनी गृहकर्ज काढले असल्यास त्यांना करातून सूट मिळवण्यासाठी फायदा होतो. गृहकर्जावरील व्याजावर1.5 लाख रुपयांच्या करसवलतीचा लाभ घेता येतो. ज्यांनी गृहकर्ज घेतले आहे ते 31 मार्च 2022 पर्यंत 3.5 लाख रुपयांच्या करसवलतीचा लाभ घेता येतो.

मुलांच्या शिक्षणावरील खर्च

मुलांच्या शिक्षणावर करण्यात आलेल्या खर्चाची बिलं सादर करुन करसवलत घेता येते. मात्र, विद्यार्थ्यांच्या शालेय फीवर 80 सीनुसार सूट मिळते. एका कुटुंबातील दोन मुलांच्या शालेय फीवर सूट मिळते.

पीपीएफ योजना

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर नियम 80 सी द्वारे सूट घेता येईल. पीपीएफ 15 वर्षे कालावधीसाठी घेतल्यास पहिल्या 5 वर्षे त्यातून पैसे काढता येत नाही.

ज्येष्ठ नागरिक बचत ठेव योजना

ज्येष्ठ नागरिक बचत ठेव योजना देखील कर वाचवण्याचा चांगला मार्ग आहे. जर एखादा व्यक्ती नोकरीतून निवृत्त झाल्यास त्याला 80 सी नुसार करबचतीचा फायदा घ्यायचा असेल तर त्यानं ज्येष्ठ नागरिक बचत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करावी. त्यांना वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतची सूट घेता येते.

विमा हप्ता

करदात्यानं विविध प्रकारच्या विमा पॉलिसी काढलेल्या असतात त्यामधील विमा पॉलिसीच्या हप्त्याच्या रकमेवर देखील 80 सीनुसार सूट मिळते.

सुकन्या समृद्धी योजना

करबचत करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 10 वर्ष वयाच्या मुलीच्या खात्यावर खाते उघडता येते. एका कुटुंबातील दोन मुलींच्या नावावर खाते काढता येते. 80 सी अंतर्गत गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपये वार्षिक जमा केल्यास कर सवलत मिळते.

एनपीएसवर देखील सूट

नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये गुंतवणूक करुन देखील तुम्ही कर सवलत मिळवू शकता. एनपीएसद्वारे करदाते सेक्शन 80 सीसीडी (1), सेक्शन 1 बी आणि सेक्शन 80 सीसीडी (2) या तीन पर्यायांद्वारे सूट मिळू शकते. एनपीएसद्वारे 10 टक्केपर्यंत सूट मिळू शकते.

एचआरएवर देखील सूट

इन्कम टॅक्सचा नियम 10 (13 ए) नुसार एचआरए म्हणजेच हाऊसिंग रेंट अलाऊन्स वर देखील करसवलत मिळते. एचआएवर देखील करदाते सूट मिळवू शकतात.

संबंधित बातम्या:

PNB बँकेची जबरदस्त ऑफर, स्वस्तात घर खरेदीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार

Business Idea | 10 हजारांची गुंतवणूक, दरमहिना 30 हजारांची कमाई, घरबसल्या सुरु करा ‘हा’ बिझनेस

(Income Tax Return how to take benefit from tax saving rules check here)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.