आयकरात 1 एप्रिलपासून होणार हे 10 बदल, तुमच्यावर काय होणार परिणाम
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यंदा अर्थसंकल्प सादर करताना आयकर सुटची मर्यादा वाढवली. ही मर्यादा सात लाखांवर गेली आहे. पण नवीन कर प्रणाली आणि जुन्या कर प्रमाणालीत काय फरक आहे? ही सुट तुम्हाला कशी मिळेल? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे.
नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. यंदा 1 एप्रिलपासून आयकराच्या नियमात अनेक बदल होत आहेत. या नियमांची माहिती एक करदाता म्हणून तुम्हाला असणे गरजेचे आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यंदा अर्थसंकल्प सादर करताना अनेक बदल केले. हे बदल 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यात महत्वाचे म्हणजे आयकर सुटची मर्यादा वाढवली आहे. पण ही सुट नवीन कर प्रणालीत आहे. जुन्या कर प्रमाणालीत ही सुट नाही. मग आयकरामधील सात लाखांची सुट तुम्हाला कशी मिळेल? यासह इतर प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे.
नवीन कर प्रणाली : जर एखादा व्यक्ती कोणत्या पद्धतीचा वापर करुन आयकर अर्ज दाखल करत आहे, हे सांगत नसेल तर नवीन प्रणाली डीफॉल्ट असणार आहे.
सात लाखांची मर्यादा : नवीन कर प्रणालीची निवड केल्यावरच तुम्हाला सात लाखांच्या मर्यादेचा वापर करता येईल. जर जुन्या प्रणालीचा वापर करुन आयकर भरण्याचा प्रयत्न केल्यास ही मर्यादा लागू राहणार नाही
आयकराचे टप्पे : जुन्या पद्धतीने आयकर भरल्यास 0 ते 3 लाखांपर्यंत आयकर लागणार नाही. 3 ते 6 लाखांपर्यंत 5 टक्के तर 6 ते 9 लाखांपर्यंत 10 टक्के आयकर लागणार आहे. 9 ते 12 लाखांपर्यंत 15 टक्के तर 15 लाखांचा वर उत्पन्न असल्यास 30 टक्के आयकर भरावा लागणार आहे.
स्टॅडर्ड डिडक्शन : जुन्या प्रमाणीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजार होती. आता त्यात वाढ करण्यात आली आहे.
सुट्यांचे पैसे : 1 एप्रिल 2023 पासून 25 लाखांपर्यंत लिव्ह इनकँशमेंट करमुक्त असणार आहे. यापूर्वी ही मर्यादा फक्त 3 लाख रुपये होती.
सोने कन्वर्जन मोफत : येत्या १ एप्रिलासून फिजिकल सोने इलेकट्रॉनिक गोल्ड रिसीटमध्ये बदलता येणार आहे. त्यासाठी कोणताही कर लागणार नाही. तसेच फिजिकल गोल्ड सोन्यात बदल्यानंतर कर द्यावा लागणार नाही.
मार्केट लिंक्ड डिबेंचर्स : मार्केट लिंक्ड डिबेंचर्समध्ये केलेली गुंतवणूक शॉर्ट टर्म कॅपिटल संपत्ती असणार आहे.
जीवन विमा : पाच लाखांपेक्षा जास्त प्रीमियम असणाऱ्या विमा पॉलिसीमधून मिळणारे रिटर्न आता करमुक्त नसणार आहे. आतापर्यंत ही रक्कम करमुक्त होती.
वरिष्ठ नागरिक : वरिष्ठ नागरिकांसाठी बचत योजनांची मर्यादा 15 लाखांवरुन 30 लाख करण्यात आली आहे.
डेट म्युच्युअल फंड : 1 एप्रिलपासून, डेट म्युच्युअल फंडांवर एलटीसीजी कर लाभ दिले जाणार नाहीत.
Income Tax Return : ITR भरताना या चुका करु नका, अन्यथा होईल दंड…सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा