Income Tax: करबचत करण्याचे सहा प्रभावी मार्ग, जाणून घ्या सर्वकाही
Income Tax | आयकर कायद्यातील कलम 80 सी अंतर्गत भविष्य निर्वाह निधी, जीवन विमा, पीपीएफ, ईएलएसएस स्कीममधील गुंतवणूक आणि मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी आयकरातून दीड लाखांपर्यत सूट मिळते. तसेच गृहकर्जाच्या मुद्दल रक्कमेची परतफेड आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेतील गुंतवणूकीवर करमाफी लागू होते.
नवी दिल्ली: सध्याच्या महागाईच्या आणि अनिश्चिततेच्या काळात प्रत्येक पैसा जपून वापरणे गरजेचे झाले आहे. एरवी तुम्ही गुंतवणूक करताना फारसे खोलात शिरत नाही. मात्र, यामुळे तुम्हाला जास्त कर (Tax) भरावा लागू शकतो. मात्र, नियोजनपूर्वक गुंतवणूक केल्यास तुम्ही मोठ्याप्रमाणावर करबचत करु शकता. अगदी तुमच्या पगारात असणाऱ्या अलाऊन्समध्येही बदल झाल्यास तुमचा कर कमी किंवा जास्त होऊ शकतो. अशाप्रकारची आर्थिक पथ्यं पाळल्यास तुम्ही चांगल्याप्रकारे करबचत करु शकता.
प्रोव्हिडंट फंड, जीवन विमा आणि पेन्शन स्कीम
आयकर कायद्यातील कलम 80 सी अंतर्गत भविष्य निर्वाह निधी, जीवन विमा, पीपीएफ, ईएलएसएस स्कीममधील गुंतवणूक आणि मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी आयकरातून दीड लाखांपर्यत सूट मिळते. तसेच गृहकर्जाच्या मुद्दल रक्कमेची परतफेड आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेतील गुंतवणूकीवर करमाफी लागू होते.
NPS चा फायदा मिळवा
तुम्ही कंपनीकडे NPS बेनिफिट देण्याची मागणी करु शकता. आयकर कायद्यातील सेक्शन 80CCD(2) नुसार तुम्हाला बेसिक वेतनाच्या 10 टक्के रक्कम पेन्शन स्कीममध्ये गुंतवता येऊ शकते. या हिशेबाने तुमच्या कंपनीने प्रत्येक महिन्याला 5,967 रुपये पेन्शन स्कीममध्ये जमा केले तर तुम्ही जवळपास 15 हजार रुपयांची करबचत करु शकता.
आरोग्य विमा
आयकराच्या कलम 80 ड नुसार आरोग्य विम्याच्या हप्त्यावर 250 हजारापर्यंत करमाफी मिळते. तुम्ही घरातील ज्येष्ठ व्यक्तींसाठीचा आरोग्य विमा घेतला असेल तर करमाफीची मर्यादा 50 हजारापर्यंत आहे. तर आरोग्य तपासण्यांसाठी झालेल्या खर्चावर 5000 पर्यंत करमाफी आहे.
शैक्षणिक कर्ज
आयकराच्या कलम 80 ई नुसार तुम्ही स्वत:साठी, पत्नीसाठी किंवा मुलासाठी शैक्षणिक कर्ज घेतले असेल तर त्याच्या व्याजाची रक्कम करमाफीसाठी पात्र असते.
वैयक्तिक गुंतवणूक कशी कराल?
तुम्ही सेक्शन 80CCD(2) अंतर्गत येणाऱ्या योजनांमध्ये 50 हजाराची गुंतवणूक केल्यास करबचत होऊ शकते. याशिवाय, तुम्हाला इक्विटी फंड आणि बाँड फंडमध्येही गुंतवणूक करुन करबचता करता येऊ शकते.
पगाराच्या रचनेत बदल?
तुम्हाला महिन्याला मिळणाऱ्या पगारातLTA ऐवजी तुम्ही फ्री पर्क्सच्या माध्यमातून 60 हजार रुपये खर्च केले तर जवळपास 12500 रुपयांचा कर वाचू शकतो. तसेच प्रत्येक महिन्याला वर्तमानपत्र आणि मॅगझिनसाठी अलाऊन्स मिळाला तर तिथे तुमची 1250 रुपयांची करबचत होऊ शकते. मात्र, त्यासाठी तुम्हाला कंपनीला बिलं द्यावी लागतील.
पगारात स्पेशल अलाउन्स म्हणून मिळणारी रक्कम कमी करण्यासाठी कंपनीला विनंती करा. त्याऐवजी पगाराचा हा भाग कर नसलेल्या पर्यायांकडे वळवा. LTA चा काही भाग कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक गोष्टींसाठी मिळणाऱ्या अलाऊन्सकडे वळवा. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPA) गुंतवणूक करा.
संबंधित बातम्या:
Business Ideas: चार लाखांच्या भांडवलात ‘हा’ व्यवसाय सुरु करा; महिन्याला बक्कळ पैसा कमवा
मोदी सरकारच्या e-Shram पोर्टलवर 4 कोटी कामगारांची नोंदणी; महिलांकडून प्रचंड प्रतिसाद
Income Tax: गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टी पाळा आणि 40 हजारापर्यंत टॅक्स वाचवा