अर्थसंकल्पाआधीच परकीय गंगाजळीने सरकारची चिंता वाढवली, रुपयाला मजबूत करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार

अर्थसंकल्पाआधीच परकीय गंगाजळीची चिंता सरकारला सतावत आहे. परकीय चलनाच्या साठ्यात (Indian Foreign Exchange reserves) 67 कोटी 80 लाख डॉलरची घट झाली आहे.

अर्थसंकल्पाआधीच परकीय गंगाजळीने सरकारची चिंता वाढवली, रुपयाला मजबूत करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार
Reserve Bank of India
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 3:21 PM

मुंबई : अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना सरकारची चिंता वाढवणारी बातमी येऊन धडकली आहे. या आठवड्यात परकीय चलनाचा साठा घसरला आहे. आरबीआयच्या तिजोरीत परकीय चलनाच्या साठ्यात 67 कोटी 80 लाख डॉलरची घट झाली आहे. 21 जानेवारी रोजी भारताचा परकीय चलन साठा (Indian Foreign Exchange reserves) 67.8 दशलक्ष डॉलरने घसरून 634.287 अब्ज डॉलरवर आला आहे. रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 14 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 2.229 अब्ज डॉलरने वाढून 634.965 अब्ज डॉलर पल्याड गेला होता. तर 3 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात तो 642.453 च्या विक्रमी उच्चांकावर (Highest Score) होता. परकीय चलन साठा रिझर्व्ह बँकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आरबीआय जेव्हा वित्तीय धोरण ठरवते, तेव्हा त्याxच्याकडे परकीय चलनाचा साठा किती आहे यावरून रुपया किती मजबूत आहे हे निश्चित होते.

केंद्रीय बॅंकेच्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 21 जानेवारी परकीय गंगाजळीत जी घट झाली, तिची कारणमीमांसा करण्यात आली. परकीय चलन संपत्तीत (FCA) झालेली घसरण या घसरणीला कारणीभूत ठरल्याचे दिसून आले. परकीय चलनाच्या तुटवड्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर थेट परिणाम दिसून येतो. रुपयाचे अवमूल्यन होण्यात याचा मोठा वाटा असतो. आरबीआयच्या आकडेवारीनुसार एफसीए या आठवड्यात 1.155 अब्ज डॉलरने घटून 569.582 अब्ज डॉलरवर आली आहे. डॉलर रुपातील ही गंगाजळी देशाला मजबूत करण्याचे मानांकन आहे. परकीय गंगाजळीत डॉलरसह युरो, पाऊंड आणि येन सारख्या बिगर-अमेरिकन चलनांचा आणि त्याच्या परिणामांचा समावेश होतो.

या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 567 दशलक्ष डॉलर्सने वाढून 40.337 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. गेल्या आठवडय़ात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे असलेले विशेष रेखांकन अधिकार 68 दशलक्ष डॉलरने कमी झाले आणि 19.152 अब्ज डॉलरवर स्थिरावले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील (International Monetary Fund) देशाचा चलनसाठाही 22 दशलक्ष डॉलरने घटला आहे. तो सध्या 5.216 अब्ज डॉलरवर आला आहे.

रुपयाला बळकटी

परकीय चलन साठा रिझर्व्ह बँकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आरबीआय जेव्हा वित्तीय धोरण ठरवते, तेव्हा त्याच्याकडे परकीय चलनाचा साठा किती आहे, हे यावरून रुपयाची मजबुती दिसून येते. तिजोरीत डॉलर रुपी परकीय चलन असले तर रुपयांचे अवमूल्यन रोखता येते.

आयातीसाठी डॉलर गरजेचा

आपला देश मोठ्या प्रमाणावर आयात करतो. हा संपूर्ण व्यवहार डॉलरमध्ये करण्यात येतो. वस्तूंचे विनिमय हा डॉलर आधारित आहे. त्यामुळे भविष्यात खरेदीसाठी परकीय गंगाजळी देशाच्या तिजोरीत जमा असणं गरजेचं ठरते. त्यामुळे परकीय गुंतवणूक आणि निर्यात ही महत्त्वाची ठरते. या दोन्ही मध्ये घट थेट परकीय गंगाजळीवर परिणाम करते.

FDI मध्ये वाढ होण्याची चिन्हे

परकीय चलन साठ्याला गती मिळत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की, देशात मोठ्या प्रमाणावर थेट परकीय गुंतवणूक येत आहे. परदेशी गुंतवणूक ही अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाची आहे. परदेशी गुंतवणुकदारांची भारतीय बाजारपेठेतील गुंतवणूक ही सकारात्मक बाब ठरते. परकीय गुंतवणुकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास वाढल्याचा हा संकेत असतो.

संबंधित बातम्या

सुवर्ण नगरीत सोने घसरले, सोन्याचे भाव प्रति तोळा 900 रुपयांनी कमी, चांदी 2200 रुपयांनी गडगडली

LIC IPO: एलआयसीचं नियोजन अंतिम टप्प्यात, आयपीओची तारीख ठरली?

TRAI : प्रीपेड ग्राहकांसाठी 30 दिवसांची व्हॅलिडिटी, दूरसंचार कंपन्यांच्या खेळीला ट्रायचा चाप; ग्राहकांची लूट थांबणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.