कंपनीत अप्रायजल झालं नाही, चिंता करु नका; लॉकडाऊननंतर भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ देणार?

Salary increase | काही दिवसांपूर्वीच केंदीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातही भरघोस वाढ करण्यात आली होती. हे पैसे सप्टेंबर महिन्यापासून मिळणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कंपनीत अप्रायजल झालं नाही, चिंता करु नका; लॉकडाऊननंतर भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ देणार?
Insolvency and Bankruptcy Code IBC
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 7:21 AM

मुंबई: कोरोना संकटामुळे वेग मंदावलेली भारतीय अर्थव्यवस्था येत्या काही काळात नव्याने उभारी घेण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे गिफ्ट मिळू शकते. गेल्यावर्षीपासून कोरोना संकटामुळे अनेक कंपन्यांनी पगारवाढ लांबणीवर टाकली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पदरी सातत्याने निराशाच पडत आहे.

मात्र, ब्लूमबर्गच्या दाव्यानुसार लवकरच ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. देशातील ई-कॉमर्स, आयटी, फार्मा आणि आर्थिक सेवांशी संबंधित कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना आगामी काळात चांगली पगारवाढ मिळू शकते. हॉटेल आणि हवाई सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मात्र चांगल्या पगारवाढीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार भारताने कोरोनाची तिसरी लाटही यशस्वीपणे परतवून लावली तर एप्रिल 2022 पासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळेल. बहुतांश कंपन्यांमध्ये कमीतकमी 8 टक्के पगारवाढ होईल. त्यामुळे खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

काही दिवसांपूर्वीच केंदीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातही भरघोस वाढ करण्यात आली होती. हे पैसे सप्टेंबर महिन्यापासून मिळणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अच्छे दिन आले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कोणत्या कंपन्यांमध्ये चांगली पगारवाढ झाली?

कोरोनाकाळात देशातील प्रमुख कंपन्यांनी प्रमोशन आणि पगारवाढ रोखून धरली होती. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होईल. एक्सेंचर इंडिया (Accenture India), टीसीएस (TCS), टेक महिंद्रा (Tech Mahindra) आणि इन्फोसिस (Infosys) या कंपन्यांनी कोरोना काळातही आपल्या कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ दिली आहे.

संबंधित बातम्या:

अबब! एका वर्षात 600 टक्के रिटर्न्स; ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल

20 वर्षांचे कर्ज 10 वर्षांत कसे फेडायचे? जाणून घ्या ‘स्मार्ट सेव्हिंग्स’मधून पैशांची बचत करण्याची सोपी माहिती

Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.