ऑनलाइन फसवणूक झाली? घाबरण्याचे कारण नाही, फोनवरून फक्त हे 4 नंबर डायल करा

ज्या पध्दतीने जग वेगाने डिजिटलायझेशनकडे वळाले आहे, त्याच वेगाने ऑनलाइन फसवणुकीच्या घटना देखील वाढल्या आहेत. भारत सरकारही अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यामुळेच गृह मंत्रालयाने दूरसंचार विभागाच्या सहकार्याने नवीन हेल्पलाइन सुरू केली आहे.

ऑनलाइन फसवणूक झाली? घाबरण्याचे कारण नाही, फोनवरून फक्त हे 4 नंबर डायल करा
ऑनलाईन फ्रॉडImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 5:40 PM

मुंबई : सध्या जगात वेगाने ऑनलाइन व्यवहार सुरू झाल्याने ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Scammed) घटनाही झपाट्याने वाढू लागल्या आहे. यामुळेच ऑनलाइन पेमेंट (Online payment) करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण बातम्यांमध्ये अनेकदा ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाचतो, बघत असतो. अनेकदा आपल्या आजूबाजूच्या लोकांचीही अशाच पध्दतीने ऑनलाइन फसवणूक झाल्याचे दिसून येत असते. आपल्या बॅंक खात्यातून (Bank account) फसवणुकीच्या माध्यमातून भली मोठी रक्कम अशा प्रकारे चोरीला जाते त्यावेळी एक मोठा धक्का आपल्याला बसत असतो. त्यामुळे अशा वेळी काय करावे, हे समजत नसते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पद्धतींबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर त्यांचा उपाय योजना म्हणून वापर करू शकता.

भारत सरकारचे प्रयत्न

भारत सरकार ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यामुळेच गृह मंत्रालयाने दूरसंचार विभागाच्या सहकार्याने नवीन हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनचे काम सायबर फसवणुकीला बळी पडणाऱ्या लोकांच्या समस्येचे त्वरित निराकरण करणे आहे. गृह मंत्रालयाने 1930 हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.

पुरावे जपून ठेवा

एखाद्याची काही फसवणूक झाली तर तो व्यक्ती त्यावर कॉल करू शकतो. तुम्ही कॉल करताच तुमची तक्रार ॲक्टिव्ह केली जाईल. तक्रार सुरू आहे याचा अर्थ सर्व तपास यंत्रणा त्यावर काम करू लागतील. सोबतच या प्रकरणात स्थानिक पोलिसांचाही सहभाग असणार आहे. परंतु संबंधित व्यक्तीला सायबर फसवणुकीचे पुरावेदेखील सादर करावे लागतील. कारण सहसा सायबर फ्रॉडचा थेट संबंध बँकेशी असतो. यामुळेच जेव्हा जेव्हा सायबर फसवणूक होते तेव्हा तुम्हाला पोलिस किंवा इतर एजन्सींची मदत घ्यावी लागते.

वेळेत तक्रार नोंदवा

पीडित व्यक्तीकडून तक्रार येताच फसवणूक करणाऱ्याचे बँक खाते गोठवले जाईल. याचा सरळ अर्थ असा आहे, की फसवणूक करणारा व्यक्ती त्याच्या बँक खात्यातून पैसे काढू किंवा जमा करू शकणार नाही. पण हे करण्यासाठी आधी पीडित व्यक्तीला वर दिलेल्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करावी लागेल. अशा परिस्थितीत पीडिताचे पैसेही परत येण्याची दाट शक्यता असते. पण या तक्रारीत वेळ सर्वात महत्त्वाची आहे. योग्य वेळी तक्रार नोंदविल्यास नुकसान होण्याचा धोका कमी असतो.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.