ट्रेन तिकीट कन्फर्म होणार की नाही? आता अ‍ॅप दाखवणार, रेल्वेमंत्र्यांनी सांगितला मेगा प्लॅन

Indian Railways railway ticket: प्रवाशांना आरक्षित तिकीट बुकिंग, अनारक्षित तिकीट बुकिंग, टूर पॅकेज बुकिंग, धार्मिक ट्रेन बुकिंग, फ्लाइट बुकिंग, कॅब आणि हॉटेल बुकिंग या सेवा या ॲपवर मिळतील. तसेच ई-केटरिंग, रिटायरिंग रूम आणि एक्झिक्युटिव्ह लाउंजचे बुकिंगही करता येणार आहे.

ट्रेन तिकीट कन्फर्म होणार की नाही? आता अ‍ॅप दाखवणार, रेल्वेमंत्र्यांनी सांगितला मेगा प्लॅन
Indian Railway
Follow us
| Updated on: Sep 28, 2024 | 12:00 PM

Indian Railways: भारतीय रेल्वेने आरक्षित डब्यातून वेटींग तिकिटावर प्रवास करण्यास मनाई केली आहे. रेल्वेने इंग्रजांच्या काळापासून असलेल्या या नियमाची अंमलबजावणी आता सुरु केली आहे. रेल्वे तिकीट कन्फर्म नसल्यास प्रवास करणे अवघड झाले आहे. टीटीई तुम्हाला डब्यातून उतरवणार आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे तिकीट कन्फर्म होणार की नाही? हे दाखवणारे अ‍ॅप भारतीय रेल्वे आणत आहे. येत्या सहा महिन्यांत या अ‍ॅपचे काम पूर्ण होणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून किती सीट रिकाम्या आहेत किती भरल्या आहेत, हे सर्व सांगितले जाणार आहे.

डिसेंबरपासून अंमलबजावणी

रेल्वेकडून कन्फर्म तिकीट प्रक्रियेची सुरुवात आगामी काही महिन्यांमध्येच करण्यात येणार आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा डिसेंबर महिन्यापासून सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात मोजक्या स्टेशनवर ही सुविधी मिळणार आहे. 500 किमी प्रवाशासाठी ही सुविधा सुरु होणार आहे. कन्फर्म तिकीट होण्याची शक्यता 90 टक्केपर्यंत येणार आहे. ही योजना लागू करण्यासाठी रेल्वे एक सुपर ॲप तयार करत आहे. येत्या सहा महिन्यांत सुरु होईल. या ॲपमध्ये प्रवाशांनी निवडलेल्या मार्गांवर प्रवास करण्यासाठी त्यांचा तपशील टाकताच त्यांना ट्रेनमध्ये किती जागा रिक्त आहेत आणि किती भरल्या आहेत याची माहिती दिली जाईल.

दुसरी ट्रेन चालवली जाणार

रेल्वे या मार्गांवर धावणाऱ्या मुख्य किंवा लोकप्रिय गाड्यांव्यतिरिक्त एक तासाच्या अंतराने दुसरी ट्रेन देखील चालवेल. जेणेकरून प्रवाशांना यातही कन्फर्म तिकीट मिळू शकेल. या ट्रेनचे डबे वेटिंग तिकीट धारकांच्या श्रेणीवर आधारित असतील. स्लीपर वेटिंग जास्त असल्यास त्याच श्रेणीचे डबे या ट्रेनमध्ये दिले जातील. जर प्रवाशांकडे स्लीपर तिकीट असेल आणि ट्रेनमध्ये एसी कोच जास्त असतील तर फरक आकारुन त्याला एसीमधून प्रवास करता येईल.

हे सुद्धा वाचा

ॲपवर मिळतील या सुविधा

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, आम्ही रेल्वेसाठी एक सुपर ॲप बनवणार आहोत, ज्यामध्ये रेल्वेशी संबंधित सर्व सुविधा असतील. 2031 पर्यंत वेटिंग संपणार आहे. प्रवाशांना आरक्षित तिकीट बुकिंग, अनारक्षित तिकीट बुकिंग, टूर पॅकेज बुकिंग, धार्मिक ट्रेन बुकिंग, फ्लाइट बुकिंग, कॅब आणि हॉटेल बुकिंग या सेवा या ॲपवर मिळतील. तसेच ई-केटरिंग, रिटायरिंग रूम आणि एक्झिक्युटिव्ह लाउंजचे बुकिंगही करता येणार आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....