Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian railways free food : डबा न्यायची झंझटच नाही, ‘या’ रेल्वेमध्ये मिळतं फ्री जेवण; पटापट यादी पाहा

भारतातील रेल्वे प्रवासात मोफत जेवणाची सुविधा मिळणे हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. वंदे भारत, राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेससारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये तिकिटाच्या किमतीतच जेवण समाविष्ट असते. मात्र, सामान्य मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये ही सुविधा दिली जात नाही. या गाड्यांमध्ये प्रवाशांना वेगळे पैसे देऊन जेवण खरेदी करावे लागते.

Indian railways free food : डबा न्यायची झंझटच नाही, 'या' रेल्वेमध्ये मिळतं फ्री जेवण; पटापट यादी पाहा
Indian railwaysImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 11:04 AM

भारतातील निम्म्याहून अधिक लोक प्रवास करण्यासाठी रेल्वेची निवड करतात. भारतीय रेल्वेमधून लाखो करोडो लोक दररोज प्रवास करतात. यामुळेच भारतीय रेल्वेला जीवनवाहिनी असे म्हटले जाते. भारतीय रेल्वेमध्ये गरीब, श्रीमंत असे सगळे प्रवास करू शकतात. भारतीय रेल्वे कडून गरीब लोकांसाठी जशी एक्सप्रेस गाडी चालवली जाते, त्याच पद्धतीने श्रीमंत लोकांसाठी वंदे भारत सारख्या काही जलद गतीच्या रेल्वे देखील चालवल्या जातात. त्यात असंख्य सुविधाही दिल्या जातात. काही रेल्वेत तर मोफत जेवणही दिलं जाते. अशा कोणत्या रेल्वेत मोफत जेवण दिलं जातं ते आज आपण पाहणार आहोत.

ऑन बोर्ड केटरिंग सुविधा

साधारणपणे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येच ऑन बोर्ड केटरिंग सुविधा दिली जाते. कमी अंतरावर जाणाऱ्या गाड्यांमध्ये ऑन बोर्ड केटरिंग सुविधा मिळत नाही. खरंतर संपूर्ण देशामध्ये फक्त काही मोजक्या रेल्वे आहेत ज्यामध्ये प्रवाशांना फ्री मध्ये जेवण दिल्या जाते आणि त्यांना त्याच्यासाठी कुठलाही प्रकारचे वेगळे पैसे आकारले जात नाही.

या रेल्वेमध्ये फ्री जेवण

वंदे भारत एक्सप्रेस, गतिमान एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस,शताब्दी एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस यासारख्या काही प्रीमियम रेल्वे आहेत, ज्यामध्ये प्रवाशांना फ्रीमध्ये जेवण दिल्या जाते. यामध्ये प्रवाशांकडून जेवणासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारल्या जात नाही. या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तिकीट बुक करायचा वेळीच जेवणाचे पैसे सुद्धा घेतले जातात म्हणजे जेव्हा आपण रेल्वेमध्ये तिकीट बुक करतो त्या तिकिटाच्या दरात जेवण्याचे पैसे देखील समाविष्ट असतात. यामध्ये फरक फक्त एवढाच आहे की बाकी रेल्वेमध्ये आपल्याला वेगळे पैसे देऊन जेवण घ्यावे लागतं. पण इथे वेगळे पैसे देण्याची काहीच गरज पडत नाही.

इथे द्यावे लागतात वेगळे पैसे

सामान्य मेल एक्सप्रेसमध्ये प्रवाशांकडून तिकिटासोबत जेवणाचे पैसे घेतले जात नाहीत. त्यावेळी सर्वसाधारण बोगीतून प्रवास करणाऱ्यांना पैसे देऊनच जेवण विकत घ्यावं लागतं. चहा आणि पाणी घ्यायचे असेल तर त्याचेही पैसे मोजावे लागतात. पण जर तुम्ही वंदे भारत, जलद एक्सप्रेस, राजधानी किंवा शताब्दी यासारख्या रेल्वेमधून प्रवास करता तेव्हा तुम्हाला जेवणाचे वेगळे पैसे द्यावे लागत नाही.

CCTV बंद करून कराडला तुरुंगात चहा, नाश्ता मिळतो, दमानियांचा आरोप
CCTV बंद करून कराडला तुरुंगात चहा, नाश्ता मिळतो, दमानियांचा आरोप.
'औरंगजेबाचा जप तोंडी, ते हिंदुत्ववादी ढोंगी?', भाजपच्या नेत्याची टीका
'औरंगजेबाचा जप तोंडी, ते हिंदुत्ववादी ढोंगी?', भाजपच्या नेत्याची टीका.
विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? कोणाची लागणार वर्णी, पाहा Video
विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? कोणाची लागणार वर्णी, पाहा Video.
'थोड्याच दिवसांचे सोबती, घरी येऊन...', इंद्रजीत सावंतांना पुन्हा धमकी
'थोड्याच दिवसांचे सोबती, घरी येऊन...', इंद्रजीत सावंतांना पुन्हा धमकी.
'त्या'वादग्रस्त विधानानंतर मंत्री योगेश कदम यांची पहिली प्रीतिक्रिया
'त्या'वादग्रस्त विधानानंतर मंत्री योगेश कदम यांची पहिली प्रीतिक्रिया.
तुला आया-बहिणी..., आव्हाडांची एकेरी उल्लेख करत गृहराज्यमंत्र्यावर टीका
तुला आया-बहिणी..., आव्हाडांची एकेरी उल्लेख करत गृहराज्यमंत्र्यावर टीका.
ठाकरे-शिंदेंच्या शिवसेनेचं मनोमिलन? रायगडमधील त्या बॅनरची तुफान चर्चा
ठाकरे-शिंदेंच्या शिवसेनेचं मनोमिलन? रायगडमधील त्या बॅनरची तुफान चर्चा.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्री कदम, सावकारेंना घरचा आहेर..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्री कदम, सावकारेंना घरचा आहेर...
दत्ता गाडेला कोर्टात हजर करणार; कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक
दत्ता गाडेला कोर्टात हजर करणार; कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक.
स्वारगेट प्रकरणातील आरोपी बचावला, 3 दिवसात तीनदा आत्महत्येचा प्रयत्न?
स्वारगेट प्रकरणातील आरोपी बचावला, 3 दिवसात तीनदा आत्महत्येचा प्रयत्न?.