Indian Railways: 29 ऑगस्टपासून IRCTC भारत दर्शन विशेष ट्रेन चालवणार, जाणून घ्या सर्वकाही

हैदराबाद-अहमदाबाद-निष्कलंक महादेव शिव मंदिर-अमृतसर-जयपूर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी यांसारखी ठिकाणं पाहता येणार आहेत.

Indian Railways: 29 ऑगस्टपासून IRCTC भारत दर्शन विशेष ट्रेन चालवणार, जाणून घ्या सर्वकाही
Special Train
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 11:26 AM

नवी दिल्लीः भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी (Indian Railways) नवीन ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) 29 ऑगस्टपासून ‘भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेन’ (Bharat Darshan Special Tourist Train) सुरू करण्याची घोषणा केलीय.

हा दौरा 29 ऑगस्टपासून सुरू होणार

हैदराबाद-अहमदाबाद-निष्कलंक महादेव शिव मंदिर-अमृतसर-जयपूर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी यांसारखी ठिकाणं पाहता येणार आहेत. टूर पॅकेजची एकूण किंमत 11,340 रुपयांपासून सुरू होणार आहे. हा दौरा 29 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 10 सप्टेंबरला संपणार आहे.

देशातील सर्व महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेट देणार

आयआरसीटीसी टुरिझमनुसार, हे देशातील सर्व महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेट देणार आहे आणि हे सर्वात किफायतशीर टूर पॅकेजपैकी एक आहे. भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेनचे बुकिंग IRCTC वेबसाईट https://www.irctc.co.in/ वर ऑनलाईन उपलब्ध आहे. आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, झोनल कार्यालये आणि क्षेत्रीय कार्यालयांद्वारेही बुकिंग करता येते.

‘या’ स्थानकांवरून बोर्डिंग सुविधा

भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेनसाठी बोर्डिंग पॉईंट बनवण्यात आलेत, जिथून प्रवासी या ट्रेनमध्ये प्रवास सुरू करू शकतात. ही स्टेशन मदुराई, डिंडीगुल, करूर, इरोड, सालेम, जोलारपेट्टाई, काटपाडी, एमजीआर चेन्नई सेंट्रल, नेल्लोर, विजयवाडा या स्टेशनांवरून जाणार आहे. तसेच विजयवाडा, नेल्लोर, पेरंबूर, काटपाडी, जोलारपेट्टाई, सालेम, इरोड, करूर, डिंडीगुल, मदुराई हे डी-बोर्डिंग पॉईंट्स आहेत.

पॅकेजमध्ये काय मिळणार?

पॅकेज अंतर्गत स्लिपर क्लासमध्ये रेल्वे प्रवासाची सुविधा असेल. धर्मशाळेत रात्रीचा मुक्काम/फ्रेश अप/ मल्टी शेअरिंग आधार सुविधा असेल. सकाळी चहा किंवा कॉफी, न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या व्यतिरिक्त दररोज 1 लिटर पिण्याचे पाणी दिले जाणार आहे. ट्रेनमध्ये टूर एस्कॉर्ट आणि सुरक्षा असेल. यासह प्रवाशांसाठी प्रवास विमा देखील असेल.

संबंधित बातम्या

EMI ची रक्कम तुम्हीच ठरवा, ‘या’ बँकेकडून 5 लाखांपर्यंतच्या कर्जावर उत्तम सुविधा

‘या’ पेन्शन योजनेत जबरदस्त सुविधा, सेवानिवृत्ती निधीसह नॉमिनीला मिळणार फायदा

Indian Railways: IRCTC will run Bharat Darshan special train from August 29, know everything

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.