Dollar | डॉलर गेला भाव खाऊन..रुपयाच्या मात्र गटंगळ्या..जनतेला पुन्हा महागाईचे चटके सहन करावे लागणार?

Dollar | डॉलर दिवसागणिक भाव खातोय तर रुपया गटंगळ्या.. आता आपल्यावर एखादे आर्थिक आरिष्ट तर येणार नाही ना..

Dollar | डॉलर गेला भाव खाऊन..रुपयाच्या मात्र गटंगळ्या..जनतेला पुन्हा महागाईचे चटके सहन करावे लागणार?
रुपया घसरलाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 1:40 PM

नवी दिल्ली : शुक्रवारी सुरुवातीच्या व्यापारी सत्रात भारतीय रुपयाने (Indian Rupee) अमेरिकेन डॉलरच्या (Dollar) तुलनेत 81 स्तर पार केला. ही रुपयाची आतापर्यंतचा सर्वकालीन निच्चांकी (Lowest) कामगिरी ठरली. कालच्या तुलनेत रुपयामध्ये 44 पैशांची घसरण होत त्याने 81.23 या नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे.

अमेरिकेत रेकॉर्डब्रेक महागाई आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह (US FED Reserve) आणि बँक ऑफ इंग्लंड यांनी व्याज दरात वाढ केली आहे. युक्रेनमध्ये भूराजकीय तणाव वाढला आहे. याचा परिणाम गुंतवणुकीवर झाला आहे. गुंतवणूकदार कुठलीही जोखीम घ्यायला तयार नाहीत.

विदेशी बाजारात अमेरिकन करन्सी, डॉलर मजबूत अवस्थेत आहे. भारतीय शेअर बाजारात घसरण सुरु आहे. सोने-चांदीचे आणि क्रूड ऑईलचे भाव प्रभावित झाले आहे. एकंदरीतच मंदीची आशंका प्रबळ आहे. त्यामुळे रुपयाने बाजारात दम तोडला आहे.

हे सुद्धा वाचा

अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दरात वाढ केली आहे. त्यामुळे गुरुवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 83 गडगडला. गेल्या सात महिन्यांतील ही सर्वात खराब कामगिरी होती. काल रुपयाचे गणित फिसकटले होते. आज तर त्याने सपशेल लोटांगण घातले आहे.

रुपयाची घसरण एका मोठ्या आर्थिक संकटाची चाहूल तर नाही ना, याविषयी तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. काहींच्या मते, इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपया अजूनही मजबूत स्थितीत आहे. तर रुपयाच्या घसरणीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. तसेच देशातंर्गत आयात होणाऱ्या वस्तूंवरही त्याचा परिणाम दिसून येईल. त्यामुळे महागाईच्या मोर्चावर सरकारची आणि सर्वसामान्यांची दमछाक होणार हे नक्की.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.