नवी दिल्ली : बाजारामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट विक्रीसाठी उपलब्ध असतात. मात्र सगळेच विकले जातात असे नाही. कारण ग्राहक हे प्रोडक्टच्या निवडीबाबत खूपच सजग झाल्याचे दिसून येतात. प्रोडक्ट निवडताना सर्वप्रथम त्याचा ब्रॅन्ड लक्षात घेतला जातो. नंतर त्या ब्रॅन्डची वस्तू वापरणाऱ्या इतर ग्राहकांशी चर्चा केली जाते. एवढेच नव्हे तर कमीत कमी किमतीमध्ये अधिकाधिक गुणवत्तापूर्ण वस्तू आपल्याला कशी मिळेल याचा विचार आजचा ग्राहक करताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये वस्तुंच्या निर्मितीपासून ते तिला एक ब्रॅन्ड बनवण्यापर्यंतचा प्रवास हा कोणत्याही उद्योजकासाठी खूप कठीण असतो. मात्र या सर्व समस्यांवर मात करत मामा अर्थ (MamaEarth) ने देशात आपली एक नवी ओळख बनवली. अल्पवधीतच मामा अर्थचे प्रोडक्ट ग्राहकांच्या पसतीस उतरले. या ब्रॅन्डचा प्रवास अतिशय रोमाचंकारी असा आहे. आज आपण या ब्रॅन्ड आणि त्याच्या प्रोडक्टबद्दल जाणुन घेऊयात.
मामा अर्थ या ब्रॅन्डचा शोध हा मुळातच गरजेतून लागला आहे. गुरुग्राममध्ये राहाणाऱ्या वरुण आणि गजल अलघ या दाम्पत्याने गुरुग्राममधून मामा अर्थ नावाने उद्योगाला सुरुवात केली. त्यांच्या छोट्या बाळासाठी काही प्रोडक्ट हेवे होते. मात्र बाजारात जे काही लहान बाळांसाठीचे प्रोडक्ट असतात त्यामध्ये वेगवेळी रसायने मिसळण्यात येत असल्याची त्यांना शंका होती. असे भेसळ असलेल्या प्रोडक्टचा वापर आपल्या बाळासाठी करणे धोकादायक ठरू शकते, असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी आपल्या बाळासाठी लागणाऱ्या गरजेच्या वस्तू घरीच निर्माण करण्याचा निर्णय घेतला, आणि यातूनच पुढे मामा अर्थ नावाचा एक मोठा देशी ब्रॅन्ड उभा राहिला.
वरुण हे एका शितपेयाच्या कंपनीमध्ये विक्री व्यवस्थापक होते. त्यांनी आपला 14 वर्षांचा अनुभव पनाला लावून लहान बाळांसाठीचे प्रोडक्ट निर्माण करणाऱ्या मामा अर्थला अल्पवधीतच एक ब्रॅन्ड बनवले. केवळ 25 लाखांची गुंतवणूक करून या व्यवसायाला सुरुवात करण्यात आली होती. आज हा व्यवसाय देशातील तीनशेहुन अधिक शहरांमध्ये पोहोचला आहे. या कंपनीचा टर्नओव्ह 100 कोटींपेक्षा अधिक असून, तीस लाख लोक या कंपनीचे नियमीत ग्राहक आहेत. या कंपनीची स्थापना 2016 मध्ये करण्यात आली होती. अवघ्या पाच वर्षांमध्ये कंपनीने कोटींची उड्डाणे पार केली आहेत.
लहान मुलांच्या प्रोडक्टला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून आता कंपनीने पुरुष आणि स्त्रीयांसाठी लागणारे प्रोडक्ट देखील बनवने सुरू केले आहे. त्याला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जेव्हा कंपनी सुरु केली होती, तेव्हा एवढे चांगले यश मिळेल असे वटले नव्हते, मात्र तुमच्याकडे संयम आणि जीद्द असेल तर तुम्हाला यश नक्की मिळते अशी प्रतिक्रिया कंपंनीचे सीईओ वरुण अलघ यांनी दिली आहे.
कच्च्या तेलाचे भाव वाढले; पेट्रोल, डिझेल आणखी महागणार?
आज सादर होणार दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी; ग्रोथ रेट 9 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज
घरांसाठी म्हाडा पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यातील जमीनी ताब्यात घेणार; संबंधित विभागाकडे प्रस्ताव दाखल