‘गुगल पे’ची धमाकेदार ऑफर; एका क्लिकवर 1 लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक कर्ज

अचानक पैशांची चणचण भासल्यास अनेक जण वैयक्तिक कर्ज घेतात. पण फक्त एका क्लिकवर कर्ज मिळत असेल तर त्यासारखी भाग्याची गोष्ट नाही. या पार्श्वभूमीवर 'डीएमआय' फायनान्स 'गुगल पे'च्या माध्यमातून लोकांना कर्ज उपलब्ध करून देत आहे.

'गुगल पे'ची धमाकेदार ऑफर; एका क्लिकवर 1 लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक कर्ज
Google Pay
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 2:41 PM

मुंबईः अचानक एक लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) हवं असेल तर काळजी करण्याची गरज नाही. जर तुम्ही गुगल पे (Google Pay) वापरत असाल आणि तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल, तर तुम्हाला एका मिनिटात एक लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक कर्ज मिळू शकते. या सुविधेअंतर्गत डीएमआय फायनान्सने ठरवून दिलेल्या निकषांनुसार पूर्वपात्र पात्र युजर्सचा निर्णय घेण्यात येणार असून त्यांना गुगल पेच्या माध्यमातून कर्ज देण्यात येणार आहे. कर्जाची ही रक्कम जास्तीत जास्त 36 महिन्यांत (तीन वर्षांत) परत करता येईल. डीएमआय फायनान्स लिमिटेडने DMI Finance Limited (DMI)गुगल पेच्या प्लॅटफॉर्मवरून डिजिटल पर्सनल लोन (Digital Personal Loan)देण्याचे हे फीचर सर्व सामान्यांना उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे लागलीच कर्जाची गरज असणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा फायदा घेता येईल.

गुगल पे युजर्सना मिळणार दुप्पट फायदा

गुगल पेचा वापर केला तर डबल बेनिफिट मिळेल. तुम्हाला गुगल पेच्या ग्राहकाभिमुख सेवेचा लाभ घेता येईल. ज्याची तुम्हाला चांगली ओळख आहे. दुसरं म्हणजे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डीएमआय फायनान्स तुम्हाला तात्काळ वैयक्तिक कर्ज सुविधा उपलब्ध करून देईल.

या ग्राहकांना मिळणार कर्जाचा लाभ

गुगल पे वापरणाऱ्या सर्व वापरकर्त्यांना कर्ज मिळणार नाही. तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगला असेल तरच तुम्हाला या सुविधेचा लाभ मिळू शकेल. या सुविधेअंतर्गत डीएमआय फायनान्सने ठरवून दिलेल्या निकषांनुसार पूर्वपात्र पात्र युजर्सचा निर्णय घेण्यात येणार असून त्यांना गुगल पेच्या माध्यमातून कर्ज देण्यात येणार आहे. जर तुम्ही प्री-अप्रूव्ह्ड ग्राहक असाल तर तुमच्या तात्काळ कर्ज पुरवठा संबंधित अर्जावर रिअल टाइममध्ये प्रक्रिया होईल आणि तुमच्या बँक खात्यात झटपट कर्जाचे पैसे जमा होतील.

36 महिन्यांचे कर्ज मिळवा.

या सुविधेचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. ही रक्कम जास्तीत जास्त 36 महिन्यांत (तीन वर्षांत) परत करता येते. या भागीदारीअंतर्गत 15 हजारहून अधिक पिन कोडसाठी तात्काळ वैयक्तिक कर्ज सुविधा सुरू करण्यात येत आहे.

असा घ्या लाभ

सर्वात अगोदर गुगल पे मोबाइल ॲप मध्ये ओपन करा. तुम्ही जर प्री-अप्रूव्ह्ड लोन घेण्यास पात्र असाल तर तुम्हाला प्रमोशनअंतर्गत ऑफरचा पर्याय दिसेल. येथे तुम्हाला वैयक्तिक कर्ज पर्यायावर क्लिक करावे लागेल. पुढे डीएमआयचा पर्याय दिसेल. या ऑफर अंतर्गत एखादी व्यक्ती कमीत कमी किती कर्ज घेऊ शकते आणि त्याला जास्तीत जास्त किती कर्ज घेता येईल हे याठिकाणी तुम्हाला पाहता येईल. यासोबतच इतर तपशीलही तुम्हाला पाहता येतील. यानंतर तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. कर्जासंबंधीची विनंती मंजूर होताच कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.