Insurance Policy : विमा पॉलिसी घेऊन फसलात? पॉलिसी नाही आवडली तर काय आहे मार्ग, काय करता येईल उपाय

Insurance Policy : विमा पॉलिसीबाबत नाखूश असाल तर हा पर्याय ठरेल महत्वाचा.

Insurance Policy : विमा पॉलिसी घेऊन फसलात? पॉलिसी नाही आवडली तर काय आहे मार्ग, काय करता येईल उपाय
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 10:08 AM

नवी दिल्ली :  विमा पॉलिसीबाबत (Insurance Policy) नाखूश असाल तर नाहक त्याचे हप्ते (Insurance Premium) भरण्यात काय हाशील? नाही का. ही पॉलिसी तुम्हाला खिशावरील ताण वाटत असेल तर काय करता येऊ शकते. कधी-कधी विमा एजंटच्या गोड गोड बोलण्याला अथवा त्याला नकार कसा द्यायचा म्हणून अनेक जण विमा पॉलिसी खरेदी करतात आणि हप्ता जमा करताना मात्र त्यांना जीवावर येते. कशाला ही झंझट मागे लावून घेतली असे त्यांना वाटते. अशावेळी तुमच्याकडे काय पर्याय आहे. तुम्ही काय करु शकता. पॉलिसी बंद करता येते का, पॉलिसीचा हप्ता बंद करण्याचा पर्याय योग्य ठरतो का, त्यात काय नुकसान होते? या सर्व गोष्टींचे फायदे-तोटे काय हे पाहणे महत्वाचे ठरते.

विमा पॉलिसी खरेदीनंतर, या निर्णयाबाबत नाखूश असाल तर सर्वात अगोदर ही पॉलिसी सुरु ठेवणे अथवा बंद करण्यातील फायदे-तोटे समजून घ्या. एखाद्यावेळी एजंटकडून पॉलिसीचे फिचर्स सांगण्यात कमी-जास्त होऊ शकते. अथवा तुम्हाला पॉलिसीचे फायदे कळाले नाहीतर त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

विमा पॉलिसीचे हप्ते भरुन अनेक वर्ष होत असेल आणि मॅच्युरिटीसाठी केवळ तीन चार वर्षे उरले असतील तर अशावेळी पॉलिसी बंद करु नका. ही पॉलिसी बंद न केल्यास जीवन विमा संरक्षण मिळतेच, पण पॉलिसीचा परतावा आणि कर सवलतही मिळते.

हे सुद्धा वाचा

पहिलेच काही हप्ते भरले असतील तर पॉलिसीचा हप्ता (policy premium) बंद करता येईल. त्यामुळे या पॉलिसीत तुम्हाला पुन्हा गुंतवणूक करण्याची गरज नसेल. पण एक-दोन वर्षे पॉलिसीत गुंतवणूक करत असाल तर नुकसान होईल. विमा कंपनी सुरुवातीच्या दोन वर्षांची रक्कम ठेऊन घेते, तुम्हाला ती रक्कम परत करत नाही.

पॉलिसी खरेदीनंतर तीन वर्षानंतर बंद केल्यास त्यावरील सरेंडर वॅल्यू मिळते. तीन वर्षांत पॉलिसीतून थोडाफार परतावा मिळतो. त्याआधारे काही रक्कम मिळवून तुम्हाला पॉलिसी सरेंडर करता येते. यामध्ये ही गुंतवणूक रक्कमेपासून कमी रक्कम मिळते. नुकसान होते.

सरेंडर व्हॅल्यू एकूण रक्कमेच्या जवळपास 30% असते. याचा अर्थ या पॉलिसीत तुम्ही एकूण जेवढी गुंतवणूक कराल, त्यातील 30 टक्के रक्कम कंपनी काढून घेईल. उर्वरीत रक्कम तुम्हाला परत करण्यात येईल आणि पॉलिसी बंद होईल.

तुम्ही विमा पॉलिसी बंद कराल, तर तुम्हाला आणि कुटुंबाला मिळणारे विमा संरक्षण बंद होईल. पण प्रीमियम भरणा नको आणि विमा संरक्षण हवे असेल तर तुम्हाला ही पॉलिसी paid-up policy मध्ये हस्तांतरीत करुन घ्यावी लागेल.

अशावेळी कंपनी हप्त्याची रक्कम परत तर करणार नाही. पण जीवन संरक्षण सुरु राहिल. ही रक्कम त्यासाठी वापरण्यात येईल. कोणतीही पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी घाईत, दबावात अथवा मित्र म्हणतोय म्हणून ती खरेदी करु नका. थोडा वेळ घेऊन, त्या पॉलिसीचे फायदे जाणून निर्णय घ्या.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....