FD : मुदत ठेवीवरील व्याजदरात लवकरच वाढ, या कारणांमुळे बँकांना द्यावा लागणार अधिकचा परतावा

FD : मुदत ठेवीवरील व्याजदरात लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामागील कारणे काय आहेत..

FD : मुदत ठेवीवरील व्याजदरात लवकरच वाढ, या कारणांमुळे बँकांना द्यावा लागणार अधिकचा परतावा
मुदत ठेवीवर चांगला परतावाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 8:48 PM

नवी दिल्ली : मुदत ठेव (Fixed Deposit) योजनेत गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांसाठी खूषखबर आहे. या योजनेत लवकरच अधिकचा व्याजदर (Interest Rate) मिळण्याची शक्यता बळावली आहे. येत्या काही दिवसात एफडीत (FD) गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर हा निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

येत्या काही दिवसात एफडीत गुंतवणूक करणाऱ्यांना व्याजदरात 0.50 ते 0.75 टक्के वाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यामागे काही कारणे आहेत. त्यामुळे बँका व्याजदर वाढविण्यासाठी तयार झाल्या आहेत. त्याचा फायदा बँकांनाही होणार आहे.

खरंतर बँकांकडे कर्ज मागणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यासाठी बँकांना मोठ्या रक्कमेची, निधीची गरज पडणार आहे. ही रक्कम उभी करण्यासाठी बँका एफडीच्या व्याजदरात वाढ करण्याची योजना आखत आहेत.

हे सुद्धा वाचा

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका येत्या काही दिवसात एक किंवा दोन वेळा व्याजदरात वाढ करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोणतीही जोखीम नसल्याने अनेक भारतीय ग्राहक या परंपरागत गुंतवणूक योजनेकडे आकर्षित होऊ शकतात.

कोरोनाच्या काळात आरबीआयने रेपो दरात मोठी कपात केली होती. त्यानंतर बँकांनी मुदत ठेवीवरील व्याजदरात कमालीची कपात केली होती. निर्बंध हटविल्यानंतर महागाईचा भस्मासूर भारतीयांच्या मानगुटीवर ठाण मांडून बसला आहे.

परिणामी आरबीआयने महागाई काबूत करण्यासाठी चौथ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. रेपो दरात सातत्याने वाढ झाली आहे. आता डिसेंबर महिन्यात महागाई आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा पत धोरण समितीची बैठक होऊ घातली आहे.

या सर्व घडामोडीत बँकांनी एफडीवर व्याजदर वाढीचा निर्णय घेतला आहे. काही बँकांनी मुदत ठेवीवर 7.65 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 8 टक्क्यांवर पोहचला आहे.

बाजारातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, ग्राहकांनी या योजनेवर लागलीच भुरळून जाऊ नये. त्यांनी दीर्घ मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करु नये. गुंतवणूक करायची असल्यास गुंतवणूकदारांनी अल्पावधीच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.