Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतावरचा दारिद्र्याचा शिक्का पुसला! IMFचा अहवाल, कोविड काळात रेशनचा आधार

आंतरराष्ट्रीय नाणे निधी (INDIAN MONETARY FUND) संस्थेनं भारतातील दारिद्र्याबाबत महत्वाचा अहवाल जारी केला आहे. सार्वजनिक अन्नपुरवठ्याच्या योजनांच्या आधारावर भारतातील आत्यंतिक दारिद्र्याची स्थिती जवळपास समूळ नष्ट झाल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे.

भारतावरचा दारिद्र्याचा शिक्का पुसला! IMFचा अहवाल, कोविड काळात रेशनचा आधार
आंतरराष्ट्रीय मुद्रा कोशImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 6:54 PM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणे निधी (INDIAN MONETARY FUND) संस्थेनं भारतातील दारिद्र्याबाबत महत्वाचा अहवाल जारी केला आहे. सार्वजनिक अन्नपुरवठ्याच्या योजनांच्या आधारावर भारतातील आत्यंतिक दारिद्र्याची स्थिती जवळपास समूळ नष्ट झाल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे. भारतातील उपभोगातील असमानता निर्देशांक गेल्या 40 वर्षातील नीच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. आयएमएफच्या शोधनिबंध सुरजीत भल्ला, अरविंद विरमानी आणि करण भसीन यांनी प्रसिद्ध केला आहे. शोधनिबंधात आकडेवारीच्या सहाय्यानं विश्लेषण करण्यात आलं आहे. आत्यंतिक दारिद्र्याची (Extreme poverty) टक्केवारी एका टक्क्यांहून कमी स्तरावर पोहोचल्याचं दावा संशोधनात करण्यात आला आहे. कोविड महामारीच्या विविध परिणांबद्दल देखील भाष्य करण्यात आलं आहे. 5 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध शोधनिबंधात (Research Paper) कोविडपूर्व काळात भारतात आत्यंतिक दारिद्र्याची टक्केवारी एकूण लोकसंख्येच्या 0.8 टक्के इतकी होती.

आत्यंतिक दारिद्राची व्याख्या :

जागतिक बँकेने आत्यंतिक दारिद्र्याची व्याख्या निश्चित केली आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार खरेदी क्षमता (PPP)1.9 डॉलरपेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तींच्या या श्रेणीत समावेश होतो. सार्वजनिक अन्नपुरवठा करणाऱ्या योजनेवरील अनुदान लाभार्थ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे भारतात आत्यंतिक दारिद्र्य संख्या घटल्याचे निर्देशक असल्याचं संशोधनातून स्पष्ट होत आहे.

भारताच्या कोविड-19 सामाजिक संरक्षण प्रतिसाद अभियानाला गती आणि बळ देण्यासाठी जागतिक बँकेने 1 अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. या मदतीपैकी 750 दशलक्ष डॉलर्सबाबतच्या करारावर भारत सरकार आणि जागतिक बँकेने आज स्वाक्षऱ्या केल्या. यातून गरीब आणि दुर्बल कुटुंबे, ज्यांच्यावर कोविडचा संकटाचा मोठा परिणाम झाला आहे, अशा कुटुंबांना मदत केली जाणार आहे.

गरीबी निर्मूलनासाठी जागतिक ओघ-

जागतिक बँकेने (World Bank) भारताला कोविड-19 लढा देण्यासाठी एकूण 2 अब्ज डॉलर्सची मदत केली होती. सामाजिक अन्न सुरक्षेसोबत आरोग्य विषयक मदतीसाठी स्वतंत्रपणे जागतिक बँकेने 1 अब्ज डॉलर्स मदतीची घोषणा केली होती. आर्थिक वर्ष 2020 मध्ये त्वरित 750 दशलक्ष डॉलर्सची मदत केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यांत, म्हणजे वर्ष 2021 साली उर्वरित 250 दशलक्ष डॉलर्स दिले जाणार होते. आयएमएफच्या अहवालात गरीबी निर्मूलनासाठी जागतिक मदतीचा उल्लेख केला आहे.

संबंधित बातम्या :

SHARE MARKET: शेअर बाजारात घसरणीचं सत्र थांबेना, निफ्टीसह सेन्सेक्स गडगडला

सोनं खरेदीची संधी अजूनही गेलेली नाही, भारतीय बाजारात किंमती स्थिर, वाचा आजचे भाव

तुम्ही नवी नोकरी जॉईन करणार आहात?, मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.