FD : परताव्याच्या हमीसह FD वर मिळतील हे 5 फायदे, जाणून तर घ्या..

FD : FD चा सर्वात मोठा फायदा म्हणजे चांगला परतावा, पण त्यापेक्षाही मुदत ठेवीवर आणखीही फायदे मिळवता येतात..

FD : परताव्याच्या हमीसह FD वर मिळतील हे 5 फायदे, जाणून तर घ्या..
केवळ परतावाच नाही, हे पण फायदेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 2:57 PM

नवी दिल्ली : बचत योजना म्हटली की, सर्वात अगोदर मुदत ठेव योजना FD (Fixed Deposit) आठवते. कारण यातील गुंतवणूक सुरक्षित असते. सोबत तुम्हाला परताव्याची हमी ही मिळते. सध्या म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) गुंतवणूक वाढली आहे. पण सुरक्षित गुंतवणुकीसह चांगल्या परताव्यासाठी FD चा पर्याय चांगला आहे. पण यापेक्षाही दुसरे फायदे आहेत. ते पाहुयात..

जर तुम्ही मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला कर्जाची सुविधा मिळते. तर एफडीच्या आधारावर बँक तुम्हाला ओव्हरड्रॉफ्टची सुविधा ही देते. कारण तुमची एफडीतील रक्कम बँकेकडे गहाण असते. बँक मुदत ठेवीच्या आधारे कर्ज देते. जर तुम्ही कर्ज फेड केली नाही तर एफडीची रक्कम जमा होते.

मुदत ठेवीवर विमा आणि क्रेडिट हमी योजनेतंर्गत हमी मिळते. जर बँकेचे दिवाळे निघाले तर तुम्हाला परताव्यासह विम्याचे संरक्षणही मिळते. याअंतर्गत एफडीची रक्कम जास्त असेल तर पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. म्हणजे तुमच्या एफडीची रक्कम बुडत नाही.

हे सुद्धा वाचा

काही बँका एफडीवर जीवन विमाच्या लाभही देतात. विम्याची रक्कम एफडीइतकीच ग्राह्य असते. जास्तीत जास्त लोकांनी मुदत ठेवीत गुंतवणूक करावी यासाठी बँका ग्राहकांना अशी ऑफर देतात. पण त्यासाठी काही अटी व शर्ती असतात.

जर तुम्ही 5 वर्षांसाठी एफडी करत असाल तर प्राप्तीकर कायदा 1961 चे कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा दावा करता येतो. जर तुम्ही 5 वर्षांहून कमी कालावधीसाठी मुदत ठेवीत गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला कर द्यावा लागेल. तसेच एफडीतून पाच वर्षांच्या आत व्याजाचे 40 हजार रुपये मिळत असतील तर कर द्यावा लागतो.

व्याजाचा दर माहिती असल्याने एफडीत केलेल्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल, हे तुम्हाला अगोदरच कळते. ऑनलाईन एफडी करताना तुम्हाला एकूण रक्कमेची माहिती देण्यात येते. जेवढ्या वर्षासाठी तुम्ही गुंतवणूक कराल, त्या परताव्याची माहिती तुम्हाला मिळते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.