पोस्टाच्य ‘या’ योजनेत पैसे गुंतवा; आपल्या घराती ज्येष्ठ नागरिकांचे भविष्य आजच सुरक्षित करा
पोस्टाच्या अशा अनेक योजना आहेत. ज्यामध्ये तुमचे पैसे सुरक्षीत राहातातच सोबतच तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो. यातीच एक योजना म्हणजे सीनियन रिटीजन सेविंग्स स्कीम होय. याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
जर तुमचा येणाऱ्या काळात गुंतवणुकीचा (investment) प्लॅन असेल तर तुम्ही पोस्टाच्या सेविंग्स स्कीममध्ये (Saving Schemes) गुंतवणूक करू शकता. पोस्टाच्या विविध बचत योजनांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एक तर तुम्ही अशा योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळतो. सोबतच तुमचा पैसा देखील सुरक्षीत राहातो. समजा तुम्ही एखाद्या बँकेमध्ये एफडी किंवा इतर योजनात पैसे गुंतवले असतील आणि त्या बँकेचे दिवाळे निघाले तर तुम्हाला केवळ पाच लाखांपर्यंतचीच रक्कम परत मिळते. तसेच या रकमेवर व्याज देखील मिळत नाही. मात्र पोस्टाचे तसे नसते. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमची रक्कम परत केली जाते, ते देखील व्याजासह. त्यामुळे सध्या अनेक गुंतवणूकदार हे बचत योजनेसाठी पोस्टाच्या योजनांकडे वळत आहेत. अशीच पोस्टाची एक योजना आहे, जीचे नाव सीनियन रिटीजन सेविंग्स स्कीम (SCSS) आहे. ज्या व्यक्तींचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे, असे सर्व ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकता. आज आपण या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.
व्याज दर
पोस्टऑफीसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास सध्या स्थितीमध्ये गुंतवणुकीवर 7.4 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. एक एप्रिल 2020 पासून हे व्याज दर लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत बदल करण्यात आलेला नाही. हे व्याज तुमच्या सोईनुसार दर तीन महिन्याला, दर सहा महिन्याला किंवा वर्षात एकदाच तुमच्या खात्यात जमा होते.
गुंतवणूक कितीपर्यंत करता येते
या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करायची आहे. तुम्ही कमीत कमी हजार रुपये तर जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम या योजनेत गुंतवूण शकता. तुम्हाला या रकमेवर 7.4 टक्क्याने व्याज मिळत राहील.
खाते कोणाला ओपन करता येते
या योजनेमध्ये ज्या व्यक्तीचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे आणि ती भारतीय नागरिक आहे, अशा कोणत्याही व्यक्तीला पैसे गुंतवता येतात. पाच वर्षानंतर या योजनेचा कालावधी पूर्ण होतो. कालावधी पूर्ण झाल्यानंतर एक चांगला परतावा मिळू शकतो.