Interest Rate | या मुदत ठेवीत गुंतवा पैसा, दोन वर्षांत मिळेल जोरदार परतावा..

Interest Rate | जन स्मॉल फायनान्स बँकेने दोन वर्षांच्या आवर्ती ठेव योजनेवर 8.05 टक्के व्याजदर दिला आहे. सध्या महागाई दर 6.71 टक्के सुरु आहे. त्यापेक्षा हा आरडी दर अधिक आहे.

Interest Rate | या मुदत ठेवीत गुंतवा पैसा, दोन वर्षांत मिळेल जोरदार परतावा..
गुंतवाल तर व्हाल मालामालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 2:56 PM

Interest Rate | आवर्ती ठेव योजनेत (Recurring Deposit Scheme) दरमहिन्याला ठराविक रक्कम गुंतवल्यास मोठा परतावा (Return) मिळतो. ही रक्कम अचानक आलेल्या आर्थिक संकटात मदत करते. यावर व्याजदर (Interest Rate) निश्चित असतो. म्युच्युअल फंडात जशी SIP मार्फत गुंतवणूक करतात. तसाच काहीसा हा प्रकार आहे.

किती अवधीसाठी गुंतवणूक

आरडी खाते हे 6 महिन्यांपासून ते 10 वर्षांपर्यंत चालविल्या जाते. आपण तीन अशा आरडी पाहुयात, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना 2 वर्षांत 8 टक्के व्याजदराने परतावा मिळेल. या तीनही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत.

1 जन स्माल फायनान्स बँक

या बँकेच्या आवर्ती ठेव योजनेचा व्याजदर 15 जून 2022 पासून लागू आहेत. या योजनेचा कालावधी कमीत कमी 6 महिने तर अधिकत्तम 120 महिने आहे. या आवर्ती ठेव योजनेत अगदी 100 रुपयांपासून आरडी खाते उघडता येते. जेष्ठ नागरिकांसाठी ही बँक 8.05 टक्के व्याजदर देते. परंतु, कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच आरडीतून रक्कम काढल्यास तुम्हाला 0.5 टक्क्यांचा दंड द्यावा लागतो.

हे सुद्धा वाचा

2 उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या आवर्ती ठेव योजनेवरील व्याजदर 12 ऑगस्ट 2022 पासून लागू आहेत. गुंतवणुकीसाठीचा कालावधी कमीत कमी 6 महिने तर अधिकत्तम 120 महिने आहे. 21 महिन्यांपेक्षा अधिक आणि 24 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या आरडी स्कीमवर ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के व्याजदर देण्यात येणार आहेत. जर मुदतपूर्व आरडी स्कीम बंद केल्यास गुंतवणूकदाराला 1 टक्के व्याजदर कमी मिळेल.

3 नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेची नवीन आरडी दर 1 एप्रिल, 2022 पासून लागू आहेत. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 2 वर्षांच्या आरडीवर 8 टक्के व्याज देते. हे व्याजदर महागाई दरापेक्षा अधिक आहे. ही बँक 3 महिन्यांच्या आरडीवर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 4.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.75 टक्के व्याज देत आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.