Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल-डिझेल चढ्या दरात विकून इंडियन ऑईलने किती नफा कमावला?

Indian Oil | यंदाच्या वर्षात इंडियन ऑईलला मिळणाऱ्या मार्जिनमध्येही वाढ झाली आहे. गेल्यावर्षी कंपनीला एका बॅरलमागे 1.98 डॉलर्स इतके रिफायनिंग मार्जिन मिळत होते. हेच मार्जिन आता 6.58 डॉलर्सवर जाऊन पोहोचले आहे.

पेट्रोल-डिझेल चढ्या दरात विकून इंडियन ऑईलने किती नफा कमावला?
इंडियन ऑईल
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 6:58 AM

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑईलकडून नुकताच तिमाहीचा निकाल जाहीर करण्यात आला. एप्रिल-जून तिमाहीत इंडियन ऑईलचा नफा दुप्पट झाला आहे. या तिमाहीत कंपनीने 5941 कोटींचा नफा कमावला. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीला 1911 कोटींचा नफा झाला होता. इन्व्हेंट्री गॅस आणि पेट्रोकेमिकल मार्जिनमुळे नफा वाढल्याचे इंडियन ऑईलकडून सांगण्यात आले.

गेल्या तिमाहीत इंडियन ऑईलला एकूण 1,55,056 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. गेल्यावर्षी हाच महसूल 88,939 कोटी रुपये होता. एप्रिल- ते जून या काळात इंडियन ऑईलने 20.325 कोटी टन उत्पादनांची विक्री केली. या काळात रिफायनिंग उत्पादन 16.719 कोटी टन इतके राहिले तर पाईपलाईन नेटवर्क उत्पादन 19.875 मिलियन टन इतके राहिले.

यंदाच्या वर्षात इंडियन ऑईलला मिळणाऱ्या मार्जिनमध्येही वाढ झाली आहे. गेल्यावर्षी कंपनीला एका बॅरलमागे 1.98 डॉलर्स इतके रिफायनिंग मार्जिन मिळत होते. हेच मार्जिन आता 6.58 डॉलर्सवर जाऊन पोहोचले आहे. सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझलचे दर सार्वकालिक उच्चांकावर आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरीचा टप्पा ओलांडला असून डिझेलचीही त्याच दिशेने वाटचाल सुरु आहे.

17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल शंभरी पार

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यात सर्वप्रथम भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली होती, त्यापाठोपाठ जयपूरमध्येही पेट्रोलच्या किंमतीने शतक गाठलं होतं.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

संबंधित बातम्या:

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल एकाच किंमतीने विकणार का, पेट्रोलियम मंत्री म्हणाले…

आता कोंबड्यांच्या विष्ठेपासून तयार होणार बायोडिझेल, एका लीटरमध्ये 38 किलोमीटर मायलेज

पेट्रोल-डिझेलचं ‘शतक’, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.