रेल्वेची ‘कमाई’ एक्स्प्रेस : 4000 रुपयांची गुंतवणूक करुन दरमहिना 80 हजार कमवा

IRCTC ने व्यवसाय किंवा उद्योगस्नेही व्यक्तिंसाठी संधीचा हात पुढे केला आहे. तुम्ही महिन्याला हजारो रुपयांची उलाढाल केवळ काही हजारांच्या गुंतवणुकीने प्राप्त करू शकतात. तुम्हाला रेल्वे तिकीट काउंटर क्लर्कप्रमाणे तिकीट एजंट बनण्याची संधी (Ticket Agent) उपलब्ध झाली आहे.

रेल्वेची 'कमाई' एक्स्प्रेस : 4000 रुपयांची गुंतवणूक करुन दरमहिना 80 हजार कमवा
IRCTC
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 8:05 PM

नवी दिल्ली : तुम्ही तुमच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्याच्या तयारीत असल्यास तुमच्यासाठी नवी संधी उपलब्ध होत आहे. तुम्ही तुमचा अन्य व्यवसाय किंवा नोकरी सांभाळूनही महिन्याला हजारोंची कमाई करू शकता. तुम्हाला पैसे कमवण्याची संधी उपलब्ध केलीय भारतीय रेल्वेने. देशभरात जाळे विस्तारलेल्या भारतीय रेल्वेच्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम (IRCTC) सह पैसे कमावण्याची संधी जाणून घ्या. (IRCTC bring new opportunity as Ticket agent for unemployed to earn thousands)

बना रेल्वेचे तिकीट एजंट:

भारतीय रेल्वेची (Indian Railways) सहाय्यक कंपनी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम (IRCTC) ही रेल्वे तिकीट बुकिंगसोबत अन्य सुविधा उपलब्ध करते. देशभरातील कोट्यावधी रेल्वे प्रवासी IRCTC द्वारे उपलब्ध सेवांचा लाभ घेतात. दरम्यान, IRCTC ने व्यवसाय किंवा उद्योगस्नेही व्यक्तिंना संधीचा हात पुढे केला आहे. तुम्ही महिन्याला हजारो रुपयांची उलाढाल केवळ काही हजारांच्या गुंतवणुकीने प्राप्त करू शकतात. तुम्हाला रेल्वे तिकीट काउंटर क्लर्कप्रमाणे तिकीट एजंट बनण्याची संधी (Ticket Agent) उपलब्ध झाली आहे.

अप्लाय कसे करावे?

तुम्हाला तिकीट एजंट बनण्यासाठी सर्वप्रथम IRCTC च्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्याठिकाणी विहित प्रक्रिया पूर्ण करा आणि रेल्वेचे अधिकृत तिकीट एजंट बना. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही रेल्वेची तिकीटे बुक करण्यास सक्षम असाल. प्रति तिकीट बुकिंगवर तिकीट एजंटला आकर्षक कमिशन दिले जाते.

नेमकं कमिशन किती?

तिकीट एजंटला मिळणारी कमिशनची रक्कम रेल्वे कोचनुसार भिन्न आहे. नॉन-एसी तिकीट बुकिंगसाठी प्रति तिकीट 20 रुपये आणि एसी तिकीट बुकिंगसाठी 40 रुपये कमिशन प्राप्त होईल. IRCTC तिकीट बुकिंगचे महत्वाचे वैशिष्ट्य तिकीट बुकिंगवर कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. महिन्याला तुमची क्षमता आणि उपलब्धतेनुसार तिकिटांचे बुकिंग करू शकतात. तसेच 15 मिनिटांत तत्काळ तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध असेल.

40-80 हजारांची कमाई

महिन्याला बुकिंग करण्यात येणाऱ्या तिकीट संख्येवर मर्यादा नाही. एजंटला प्रति महिन्याला मिळणाऱ्या कमिशनमधून किमान 40 हजार आणि कमाल 80 हजार रुपयांचे वेतन मिळू शकेल.

एजंट बनण्याचे शुल्क किती?

तुम्ही एक वर्षासाठी तिकीट एजंट होऊ इच्छित असल्यास IRCTC ला वार्षिक 3,999 रुपयांचे शुल्क अदा करावे लागेल आणि दोन वर्षासाठी 6999 रुपये भरावे लागतील. तसेच एजंटच्या रुपात एका महिन्यात 100 तिकीट बुक करण्यावर प्रति तिकीट 10 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल आणि 101-300 तिकीट बुकिंगवर प्रति तिकीट 8 रुपये आणि 300 हून अधिक तिकिटावर प्रति तिकीट पाच रुपयांचे शुल्क अदा करावे लागेल.

इतर बातम्या

गुड न्यूज, इलेक्ट्रीक बाईकवर कर सवलतींचा पाऊस; इलेक्ट्रीक बाईकला सरकारी बॅकअप

UPI पेमेंट करताना रहा सावधान, नाहीतर व्हाल कंगाल; सुरक्षीत पेमेंट हीच खात्यातील रकमेची हमी 

नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवतायेत? मग ‘आयआरसीटीसी’ ही खास ऑफर तुमच्यासाठी

(IRCTC bring new opportunity as Ticket agent for unemployed to earn thousands)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....