IRCTC Push Notification | ट्रेन तिकीटच्या बुकिंगसाठी भटकणं बंद, आता मोबाईलवर मिळणार सर्व माहिती

तसेच त्या रेल्वेत किती जागा रिकामी आहे, तुमची सीट कन्फर्म आहे का? यांसह इतर माहितीही मोबाईलच्या मॅसेजद्वारे मिळणार आहे. (IRCTC launches push notification service)

IRCTC Push Notification | ट्रेन तिकीटच्या बुकिंगसाठी भटकणं बंद, आता मोबाईलवर मिळणार सर्व माहिती
irctc
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 8:35 AM

IRCTC Push Notification Service : ट्रेनची कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी यापुढे तुम्हाला कोणतीही मेहनत करायची गरज भासणार नाही. तसेच एजंटला जास्त पैसे देऊन तिकीट बुक करायची किंवा इंटरनेटवर जाऊन चाचपणी करण्याचीही काही गरज नाही. कारण जर तुम्हाला देशविदेशात, धार्मिक किंवा पर्यटनस्थळी, तसेच सुट्टीदरम्यान फिरायला जायचे असल्यास IRCTC विशेष टूर पॅकेज जारी केले आहे. विशेष म्हणजे या पॅकेजसह तिकीटाची बुकींग, हॉटेल बुकिंग याची माहिती प्रवाशांना थेट त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. IRCTC Push Notification द्वारे प्रवाशांना ही माहिती मिळणार आहे. (IRCTC launches push notification service)

आयआरसीटीसी लवकरच प्रवाशांच्या आणि ग्राहकांसंबधीच्या कामाची माहिती त्यांना मिळावी, यासाठी पूश नोटिफिकेशन सर्व्हिस सुरु करणार आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नवीन रेल्वे, रिक्त जागा यांसह विविध माहिती देणार आहे. तसेच त्या रेल्वेत किती जागा रिकामी आहे, तुमची सीट कन्फर्म आहे का? यांसह इतर माहितीही मोबाईलच्या मॅसेजद्वारे मिळणार आहे.

यांसह इतर सुविधाही ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध याव्यात यासाठी आयआरसीटीसीतर्फे “पुश नोटिफिकेशन” सेवा देण्यात येणार आहे. ग्राहकांना या सेवेचा लाभ मिळावा यासाठी IRCTC ने मोबाईल तंत्रज्ञान संस्था मेसर्स मोमॅजिक टेक्नॉलॉजीशी करार केला आहे.

ग्राहकांना फ्री सेवा मिळणार

पूश नोटिफिकेशन म्हणजे एक पॉप-अप मेसेज असणार आहे. हा मेसेज तुम्हाला मोबाईल नोटिफिकेशनद्वारे मिळणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संबंधित माहिती लगेच मिळणार आहे. पर्यटन आणि तिकिटासंबंधित सेवांना प्रोत्साहन मिळावं यासाठी आयआरसीटीसी आपल्या ग्राहकांना ही माहिती देणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांसाठी ही सेवा अगदी विनामुल्य असणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर याबाबची सर्व नोटिफिकेशन पाठवल्या जातील.

या सेवेचा लाभ मिळणार

  1. आईआरसीटीसी ट्रेनची माहिती (वेळापत्रक आणि वेळ)
  2. नव्या ट्रेनसंबंधित माहिती, रिक्त जागांविषयी माहिती
  3. ट्रेन व्यतिरिक्त हवाई तिकिट बुकिंगशी संबंधित माहिती
  4. हॉटेल आणि कॅब बुकिंग व्यतिरिक्त बस बुकिंग सेवा
  5. कॅटरिंग सेवांसह टूर पॅकेजची माहिती

IRCTC Push Notification सेवेचे काही ठळक मुद्दे

  • IRCTC ने ग्राहकांना पूश नोटिफिकेशनसाठी मोबाईल तंत्रज्ञान संस्था मेसर्स मोमॅजिक टेक्नॉलॉजीशी करार केला आहे.
  • एखादी माहिती ग्राहकांना कमीत कमी वेळेत पोहोचवण्यासाठी ‘पुश नोटिफिकेशन’ हे तंत्रज्ञान अतिशय उत्तम मानलं जात आहे.
  • या तंत्रज्ञान माध्यमातून तुम्हाला एखादी माहिती तात्काळ मिळू शकते.
  • गाड्यांमध्ये कॅटरिंग सेवा, पर्यटन, तिकीट इत्यादींशी संबंधित माहिती  दिली जाईल.
  • सध्याच्या प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये एखादी सीट कन्फर्म असल्याची माहिती मिळू शकत नाही.
  • डिजिटल युगात सामान्यत: स्थिती तपासण्यापूर्वी काही रिक्त जागादेखील बुक केल्या जातात.
  • पुश सूचना सेवेद्वारे ही समस्या सोडविली जाईल. तसेच ग्राहकांच्या इतर फायद्याच्या सेवांविषयी माहिती देखील उपलब्ध असेल. (IRCTC launches push notification service)

संबंधित बातम्या : 

Coronavirus: मास्क घालून बोलण्यात अडचण येतेय, मग हा मास्क पाहाच

हत्या प्रकरणात शिक्षा झाल्यास सुशील कुमारची ऑलिम्पिक पदकं काढली जाणार? वाचा सविस्तर

'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.