मुंबई: यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील अनेक भागांना पूर आणि अन्य नैसर्गिक संकटांचा फटका बसला आहे. अगदी मुंबईसारख्या शहरातही यंदाच्या मोसमात वादळी वारे अनुभवायला मिळत आहेत. मध्यंतरी निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत अनेक झाडे मुळापासून उन्मळून पडली होती. यामध्ये झाडांखाली उभ्या असलेली वाहने चक्काचूर झाली होती.
यापैकी काही वाहनांचा विमा उतरवला असूनही त्याचे पैसे मिळण्यात बऱ्याच अडचणी आल्या. तुम्ही वाहनाचा विमा (Insurance) काढलात की एखाद्या दुर्घटनेनंतर तुम्हाला त्याचे पैसे मिळतीलच याची शाश्वती नसते. त्यासाठी तुमच्या विम्याच्या अटींमध्ये नैसर्गिक संकटात झालेल्या नुकसानभरपाईचा समावेश आहे की नाही, हे तपासून पाहावे. फार मोजक्या विमा कंपन्या नैसर्गिक संकटात नुकसान झाल्यास भरपाई देतात.
तुम्ही तुमच्या वाहनाचा कॉम्प्रिहेन्सिव इन्शुरन्स काढलात तर तुम्हाला नैसर्गिक संकटात नुकसान झाल्यानंतर नुकसानभरपाईचे पैसे मिळण्याची शक्यता वाढते. या विम्यामध्ये पावसाळ्यात झाड पडणे, जमीन खचल्यामुळे वाहनाचे नुकसान होणे अशा गोष्टींचा समावेश असतो.
प्रत्येक वाहनासाठी विमा अनिवार्य करण्यात आला आहे. यामध्ये अनेकजण थर्ड पार्टी इन्शुरन्स घेतात. मात्र, तुम्ही बाहेरगावी जात असाल आणि त्याठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता वाटत असेल तर तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव इन्शुरन्स घेऊ शकता. मात्र, थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये तुम्हाला नैसर्गिक संकटात झालेल्या नुकसानासाठी भरपाई मिळत नाही.
दुर्घटना झाल्यानंतर विमा कंपनीशी बोलून त्यांनी सांगितलेल्या प्रक्रियेचे पालन करावे. तसेच दुर्घटना घडली तेव्हाचे व्हीडिओ रेकॉर्डिंक करून ठेवणे श्रेयस्कर. विमा कंपनीकडून मागणी करण्यात आलेली सर्व कागदपत्रे जमा करावीत. त्यानंतर तुम्हाला विम्याचे पैसे अदा केले जातात.
संबंधित बातम्या:
फास्टॅग लावलेली गाडी चालवत असाल तर ‘हे’ 5 नियम जरूर वाचा, अन्यथा दोनदा पैसे भरावे लागतील
(What is the difference between normal vehicle insurance and comprehensive insurance)