मेल-एक्सप्रेसचे तिकीट हरवले तरी प्रवास करता येतो का ? नियम जाणून घ्या
लांबपल्ल्याच्या ट्रेनमधून प्रवास करताना तर तिकीट हरविले तरी प्रवास करता येतो, परंतू याबाबत रेल्वेचे काही नियम आहेत, काय आहेत ते नियम पाहूयात...
मुंबई : भारतीय रेल्वेचे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यापैकी एक आहे. भारतात रोज सुमारे दोन कोटी लोक रेल्वेने प्रवास करीत असतात. लांबपल्ल्याच्या ट्रेनमध्ये एसीची सुविधा, खानपान व्यवस्था, कन्फर्म सिट आणि शौचालय आदीमुळे प्रवास सुसह्य होतो. यात स्लीपर क्लास सह एसी क्लासच्या दर्जाचा प्रवास करता येतो. परंतू आपल्याला लांबपल्ल्याच्या ट्रेनचे तिकीट थोडे आधी काढावे लागते. अनेक मार्गांवर तिकीटांची मागणी एवढी आहे की वेटींगचे तिकीट मिळते. आता अनेक जण ऑनलाईन तिकीटे काढत असले तरी आताही अनेक जण तिकीट खिडक्यांवर जाऊन तिकीट काढतात. परंतू तुमचे तिकीट हरविले तर काय आहेत रेल्वेचे नियम ? पाहूयात
नियम काय आहेत ?
समजा तुम्ही लांबपल्ल्याच्या ट्रेनमधून प्रवास करणार आहात आणि तुमचे तिकीट खिडकीहून काढलेले तिकीट हरवले ? अशा स्थितीतही तुम्ही रेल्वेचा प्रवास करू शकता. कारण यासाठी एक महत्वाचा नियम आहे. त्यामुळे तुम्ही काही नियम पाळला तर तुम्हाला तुमचे तिकीट हरवून देखील प्रवास करता येतो.
जर तुमचे तिकीट प्रवास करण्यापूर्वी जर हरविले तर तुम्हाला तुमचे नविन तिकीट 50 रूपयांचा दंड भरून पुन्हा तयार करता येते. परंतू तुम्ही विचार करत असाल की तिकीट तर काढले होते. परंतू हरविले तर पन्नास रुपये दंड कशाला ? परंतू पन्नास रूपये दंड भरावाच लागतो. जर तुम्ही हा पन्नास रुपयाचा दंड भराला नाही तर तुम्हाला रेल्वेच्या नियमानूसार खूप जास्त दंड आकाराला जाऊ शकतो.
टीसीशी करा संपर्क….
जर तुम्ही प्रवास करताना तुमचे तिकीट गहाळ झाले तर तुम्ही ट्रेनच्या टीटीई किंवा तिकीट तपासनीसाला गाठावे लागेल, त्याला तिकीट हरविल्याचे सांगावे लागेल, त्यानंतर टीसी तुम्हाला नविन तिकीट जारी करेल. नविन तिकीट बनविता आपण आपले गंतव्य स्थानक देखील बदलू शकता. उदाहरणार्थ तुम्ही दिल्ली ते कानपूर जात आहात. परंतू नविन तिकीट तुम्ही दिल्ली ते वाराणसीचे देखील बनवू शकता, मात्र त्याचा अतिरिक्त नियमानूसार पैसे भरावे लागेल,