Income Tax: नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तीला दिलेल्या बिनव्याजी कर्जावरही टॅक्स लागतो? जाणून घ्या नियम

बिनव्याजी कर्जावर टॅक्स लावला जातो का? लावला जात असल्यास, त्याचे नियम काय आहेत? अशा कर्जासाठी इन्कम टॅक्स रिटर्नचा नियम काय आहे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया.

Income Tax: नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तीला दिलेल्या बिनव्याजी कर्जावरही टॅक्स लागतो? जाणून घ्या नियम
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 3:55 PM

बऱ्याचदा आपण नातेवाईक वा ज्या कंपनीत काम करतो,त्या कंपनीकडून कर्ज घेतो, जे कर्ज बऱ्याचदा बिनव्याजी असते. त्यामुळेच प्रश्न तयार होतो की अशा बिनव्याजी कर्जावर टॅक्स लावला जातो का? लावला जात असल्यास, त्याचे नियम काय आहेत? अशा कर्जासाठी इन्कम टॅक्स रिटर्नचा नियम काय आहे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. (Is it taxable to give interest free loan to a relative or close person? What is the rule of income tax)

समजा, तुम्हाला अचानक पैशांची गरज लागली आणि जर जास्त पैसे हवे असतील तर आपण प्रथम मित्र किंवा नातेवाईकांशी संपर्क साधतो. जर कंपनी चांगली असेल, तर कंपनीकडेही कर्ज मागण्याचा प्रयत्न करतो. पैसे आले की लगेच कर्ज फेडण्याचा तुमचा प्रयत्न असतो. त्यामुळे व्याज देण्याचा प्रश्नच येत नाही. बाजारातील तुमची पत चांगली असेल तर बिनव्याजी कर्ज सहज मिळते. ही एक चांगली गोष्ट आहे की, बिनव्याजी कर्ज घेऊन तो व्यक्ती आर्थिक संकटातून बाहेर पडतो. पण हे करताना, जेव्हा तुम्ही आयकर नियमांकडे दुर्लक्ष करता, तेव्हा मोठे संकट उभं राहतं. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेत असाल, तर एका विशेष नियमाचं पालन करणं गरजेचं आहे.

कर्ज नेहमी चेकने द्या, रोखीने नाही

सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कर्ज देणार आणि कर्ज घेणारा या दोघांवरही आयकर विभागाची करडी नजर असते. कर्जाचा व्यवहार दोघांच्याही खात्यावर नोंदवणं गरजेचं असतं. तज्ञांच्या मते, कोणत्याही गरजू व्यक्तीला बिनव्याजी कर्ज देण्यात काहीही अडचण नाही. आयकरचा कोणताही नियम या कामापासून थांबवू शकत नाही. पण हे लक्षात घेतले पाहिजे की, जर कर्जाची रक्कम 20,000 पेक्षा जास्त असेल, तर ती चेकमध्येच द्यावी लागते. रोख व्यवहार करणं टाळायला हवं. कारण, आयकर विभाग याची चौकशी करु शकतं.

बिनव्याजी कर्जाबाबत न्यायालय काय म्हणतं?

बिनव्याजी कर्जाबाबतची अनेक प्रकरणं कोर्टात गेली आहेत. यासंदर्भात, गुवहाटी उच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय आणि ट्रॅक्स ट्रिब्युनलने निर्णय दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की, जर कुणाकडे पैसा वा इतर भांडवल असेल तर, ते कसं खर्च करायचं, हा अधिकार पूर्णपणे त्या व्यक्तीचा आहे. आपला पैसा कुणाला आणि कसा द्यायचे हा पूर्णपणे वैयक्तिक आहे. यामध्ये आयकर विभागाचा हस्तक्षेप असू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या इच्छेनुसार एखाद्याला कर्ज दिले, तर त्यावर कोणताही कर लावला जाऊ शकत नाही. कराच्या भाषेत त्याला काल्पनिक कर म्हणतात.

या प्रकरणात, कुठलाही कर आकारला जात नाही

टॅक्सच्या नियमानुसार, जर तुम्ही कुणालाही बिनव्याजी कर्ज दिले तर त्यावर कोणताही कर लावला जाणार नाही. अनेक वेळा असे घडतं की, जर तुम्ही एखाद्याला 50,000 रुपयांपेक्षा जास्त बिनव्याजी कर्ज दिलं किंवा गिफ्ट म्हणून काही दिलं, तर त्यावर कुठलाही कर लागत नाही.

कंपनीकडून कर्ज घेतलं असेल तर?

आता एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला बिनव्याजी कर्ज देते, तेव्हा काय होतं हे याबद्दल बोलूया. कोणतीही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना बिनव्याजी कर्ज देऊ शकते. इथं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही, की जर तुम्ही 20 हजारांपर्यंतचे कर्ज रोखीने घेतले तर त्यावर कराची तरतूद नाही. 20 हजारांपेक्षा जास्त कर्जाचा नियम वेगळा आहे, जो इन्कम टॅक्सच्या कलम 3 मध्ये सांगण्यात आला आहे. हे कर्ज SBIच्या गृह आणि शैक्षणिक कर्जाच्या दरांसारखं विचारात घेतले जातं. फक्त जर कर्मचाऱ्याने कोणत्याही गंभीर आजारासाठी कंपनीकडून कर्ज घेतले, तर त्यावर कोणताही कर लावला जात नाही. त्यामुळं हे नियम लक्षात ठेऊनच बिनव्याजी कर्ज दिलं वा घेतलं पाहिजे.

हेही वाचा:

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.