Bank Saving Rules : बचत खात्यासंबंधीचा माहिती करा हा नियम, वाढवेल डोकेदुखी 5 लाखांपेक्षा अधिकची बचत

Bank Saving Rules : तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या बचत खात्यात किती रक्कम ठेवता येऊ शकते? बचत खात्यात एका ठराविक प्रमाणात रक्कम ठेवता येते. त्यापेक्षा अधिकची रक्कम तुमची डोकेदुखी ठरु शकते.

Bank Saving Rules : बचत खात्यासंबंधीचा माहिती करा हा नियम, वाढवेल डोकेदुखी 5 लाखांपेक्षा अधिकची बचत
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 8:58 PM

नवी दिल्ली : जर तुमचेही बचत खाते (Saving Account) असेल आणि तुम्ही त्यात तुमच्या बचतीची भलीमोठी रक्कम ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या बचत खात्यात किती रक्कम ठेवता येऊ शकते? बचत खात्यात एका ठराविक प्रमाणात रक्कम ठेवता येते. त्यापेक्षा अधिकची रक्कम तुमची डोकेदुखी वाढवू शकते. कारण जर बँक दिवाळखोरीत (Bankruptcy) गेली तर पाच लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम बुडीत खात्यात जाईल. त्यामुळे पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम तुम्हाला परत मिळू शकते. पण त्यापेक्षा अधिकची रक्कम तुम्हाला गोत्यात आणू शकते. त्यामुळे केवळ बचत खात्यात रक्कम न ठेवता, ती योग्य ठिकाणी गुंतवल्यास जास्तीचा फायदा होतो.

वर्ष 2020 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी त्यावेळी अर्थसंकल्पात एक तरतूद केली होती. त्यानुसार, अर्थसंकल्प 2020 मध्ये एक नियम तयार करण्यात आला होता. जुन्या नियमात बदल करुन, सुधारणा करुन हा नियम तयार करण्यात आला होता. त्यानुसार, नागरिकांनी बँकांमधील ठेवलेली 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीला संरक्षण देण्यात आले होते. यापूर्वी ही रक्कम एक लाख रुपये होते. जर तुम्ही अधिकची रक्कम ठेवली तर काय संकटाचा सामना करावा लागू शकतो?

बचत खात्याविषयी 2020 मध्ये कॅबिनेटने मोठा निर्णय घेतला. त्यानुसार, बँक दिवाळखोरीत गेली. बुडाली, अथवा आरबीआयने तिच्यावर कारवाई केली तरी ग्राहकांना एका निश्चित रक्कमेचा दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकेतील खातेदारांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. यापूर्वी ग्राहकांना केवळ एक लाख रुपये परत मिळत होते. पण मोदी सरकारने ही रक्कम पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली.

हे सुद्धा वाचा

बँकेचा परवाना रद्द झाल्यावर ठेवीदाराला ठेव विमा आणि क्रेडिट हमी महामंडळाकडून (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation-DICGC) एक ठराविक रक्कम नुकसान भरपाईच्या रुपात दिल्या जाते. त्यामुळे ग्राहकांना एक ठराविक रक्कम मदत म्हणून मिळते. केंद्र सरकारने ग्राहकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी रक्कम वाढविण्याचा निर्णय घेतला होता. 2020 मध्ये सरकारने याविषयीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विमा संरक्षण वाढविण्यात आले. पूर्वी बुडीत बँकेतील ठेवीदारांना एक लाख रुपये मिळत होते. आता ही रक्कम पाच लाख रुपये इतकी झाली आहे. 90 दिवसांच्या आत ही रक्कम मिळवता येते.

पण हा नियम लक्षात घ्या. म्हणजे जी बँक बुडाली, त्यामध्ये सर्व मिळून तुमची पाच लाख रुपयांच्या आत रक्कम असेल तरच तुम्हाला फायदा होईल. नाहीतर बचत खात्यात पाच लाखांपेक्षा अधिकची रक्कम असेल, मुदत ठेवीत दोन तीन लाख रुपये असतील. आवर्ती ठेव योजनेत काही रक्कम असेल तर केवळ पाच लाख रुपयांपर्यंतच ग्राहकांना नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करता येईल.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...