जेट एअरवेज पुन्हा एकदा उड्डानासाठी सज्ज; काय आहे कंपनीची भविष्यातील रणनिती?

जेट एअरवेज पन्हा एकदा हवेत भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे. जेट एअरवेजचे दिवाळे निघाले होते. त्यानंतर लावण्यात आलेली बोली जालान-कॅलरॉक कंसोर्टियम या ग्रुपने जिंकली. पुढील वर्षी  सहा विमानांसह देशांतर्गंत वाहतूक सुरू करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आले आहे.

जेट एअरवेज पुन्हा एकदा उड्डानासाठी सज्ज; काय आहे कंपनीची भविष्यातील रणनिती?
जेट एअरवेज
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 6:15 AM

नवी दिल्ली : जेट एअरवेज पन्हा एकदा हवेत भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे. जेट एअरवेजचे दिवाळे निघाले होते. त्यानंतर लावण्यात आलेली बोली जालान-कॅलरॉक कंसोर्टियम या ग्रुपने जिंकली. पुढील वर्षी  सहा विमानांसह देशांतर्गंत वाहतूक सुरू करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आले. आर्थिक संकटात सापडलेल्या  जेट एअरवेजने 18 एप्रिल 2019 ला आपली सर्व उड्डाने बंद केली होती. त्यानंतर कंपनीचा लिलाव करण्यात आला. हा लिलाव सर्वाधिक बोली लावत मुरारी लाल जालान आणि फ्लोरियन फ्रिश्च यांचा ग्रुप असलेल्या जालान-कॅलरॉक कंसोर्टियम जिंकला.

‘कंपनीसाठी पुरेशाप्रमाणात भांडवलाची उभारणी’

याबाबत बोलताना कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, आम्ही लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी उत्सुक आहोत. त्यासाठी लागणारी सर्व पूर्वतयारी झाली आहे. कर्ज निराकरण योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी आमचे  ‘एनसीएलटी’सोबत बोलने सुरू आहे. आम्ही जेट एअरवेजचे उड्डान पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी पुरेशी गुंतवणूक आणि योग्य नियोजन केले आहे. लवकरच कंपनीच्या थकबाकीदारांचे सर्व पैसे देखील देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले. जेट एअरवेजचे गैर-कार्यकारी अध्यक्ष मुरारी लाल जालान यांनी म्हटले आहे की, पुढील वर्षामध्ये सहा विमानांसह देशांतर्गत उड्डानाचा  आमचा प्लॅन आहे. त्यानंतर भविष्यात टप्प्या-टप्प्याने कंपनी आणि उड्डान सेवेचा विस्तार करण्यात येईल.  

‘आकासा’लाही मिळाल्या सर्व परवानग्या  

जेट एअरवेज या कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचे 305.76 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर कंपनीच्या दिवाळीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. जेट  एअरवेज साठी  मुरारी लाल जालान यांच्या ग्रुपने सर्वाधित बोली लावत हा लिलाव जिंकला. आता पुढील वर्षी पुन्हा एकदा जेट एअरवेज प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. तर दुसरीकडे राकेश झुनझुनवाला यांची स्टार्ट अप कंपनी असलेल्या आकासाला देखील आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे कंपनीने आता विमान खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. जेट एअरवेज प्रमाणेच लवकर आकासा देखील उड्डानाला सुरुवात करणार आहे. या दोन कंपन्यांची उड्डाने सुरू झाल्यास, विमान कंपन्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन काही अंशी भाड्यामध्ये कपात होऊ शकते.

संबंधित बातम्या

वीजबिल सबसीडी योजनेला शेतकऱ्यांचा विरोध, केंद्राकडून प्रस्ताव मागे

अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी गुंतवणुकदारांना साद, तरुण उद्योजकांच्या व्यवसायात गुंतवणूक करणा-या गुंतवणुकदारांशी पंतप्रधानांची चर्चा…

Petrol Rate Today | शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव काय आहेत, घ्या जाणून एका क्लिकवर

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.