गृहकर्जाशी संबंधित ‘या’ अटी जाणून घ्या, जेणेकरून कर्ज घेताना येणार नाही कोणतीही अडचण

तुमचा जर क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. याला तुमचे फायनान्शियल रिपोर्ट कार्ड म्हणता येईल, ज्याच्या आधारे तुमची कर्ज फेडण्याची क्षमता मोजली जाते.

गृहकर्जाशी संबंधित 'या' अटी जाणून घ्या, जेणेकरून कर्ज घेताना येणार नाही कोणतीही अडचण
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 2:29 PM

प्रत्येकाचं सामान्य माणसाचं स्वप्न असतं की स्वतःच हक्काचं एक घर असावं. तसेच जेव्हा आपण घर खरेदीचा विचार करतो तेव्हा अनेक सोयीसुविधा आपल्याला जातात. त्यात सर्वात चांगली सुविधा म्हणजे गृहकर्ज खाते. यातच तुम्ही जेव्हा बँकेत जाता त्यावेळी गृहकर्ज मिळविणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असू शकते. कर्ज देणाऱ्या बँका मंजुरीपूर्वी अनेक बाबींचा विचार करतात. जसे की तुमचे उत्पन्न, चालू कर्ज आणि क्रेडिट स्कोअर. त्यात गृहकर्जासाठी अनेकदा मोठी रक्कम आणि दीर्घ मुदतीची आवश्यकता असते, म्हणून कर्ज देणारी बँक तुमच्या अर्जाचा सखोल आढावा घेते.

यासोबतच बेसिक होम लोनचे सीईओ आणि को-फाउंडर अतुल मोंगा सल्ला देतात की, गृहकर्ज घेताना तुम्ही जर या बाबी लक्षात घेतल्यास लवकर गृहकर्ज मिळण्याची शक्यता वाढते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या बाबी…..

तुमचा व्यवसाय

तुम्ही जेव्हा एखाद्या बँकेत कर्ज काढण्यासाठी जाता तेव्हा कर्ज देणारी बँक तुमच्या व्यवसायाचा विचार करते. जर तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीत बराच काळ काम करत असाल तर तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. इतकंच नाही तर ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा इतिहास स्थिर आहे आणि उत्पन्नही स्थिर आहे, त्यांना कर्जाची मंजुरी सहज मिळते.

हे सुद्धा वाचा

त्याचबरोबर डॉक्टर, वकील, व्यवसाय अशा व्यावसायिकांच्या बाबतीत अधिक छाननी केली जाते. अशा परिस्थितीत, कर्ज देणाऱ्या बँकेला तुमच्या आर्थिक कागदपत्रांची आवश्यकता असते जेणेकरून ते तुमच्या कर्जाचे मूल्यांकन करू शकतील.

उत्पन्नाची स्थिती व पात्रता :

कर्ज मंजूर करण्यापूर्वी तुमच्या उत्पन्नाच्या स्थितीचा विचार केला जातो. कारण बँक तुमच्या असलेल्या उत्पन्नाद्वारे कर्ज फेडण्याच्या क्षमतेचा आढावा घेते. जर तुमचे उत्पन्न स्थिर असेल, ज्यामुळे तुमची भरण्याची क्षमता वाढते, तर बँक तुमच्याकडून कर विवरणपत्रे, बँक स्टेटमेंट आणि इतर आर्थिक नोंदी गोळा करते आणि तुमच्या उत्पन्नाच्या स्थिरतेचा आढावा घेते.

चांगला क्रेडिट स्कोअर:

तज्ज्ञांच्या मते, जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. याला तुमचे फायनान्शियल रिपोर्ट कार्ड म्हणता येईल, ज्याच्या आधारे तुमची कर्ज फेडण्याची क्षमता पाहिली जाते. अश्यातच तुम्ही जर तुमची सर्व देयके वेळेवर भरत असतील तर बँक या सर्व गोष्टी पाहून तुम्ही आर्थिकदृष्ट्या जबाबदार आहात आणि क्रेडिट युटिलायझेशन रेशो कमी असल्यास तुमचे क्रेडिट देखील योग्यरितीने व्यवस्थापन केले जाते.

क्रेडिट कार्ड, लोन इत्यादींचा पेमेंट हिस्ट्री तुमच्या क्रेडिटचा संपूर्ण डेटा दाखवतो. पण जर तुम्ही अलीकडे अनेकदा कर्जासाठी विचारणा केली असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असू शकतो. अश्याने तुम्हला कर्ज मिळण्यास अडथळे येऊ शकतात.

आपल्या उत्पन्नाचा विचार केला जातो

कर्ज देण्यासाठी ३० ते ५० वयोगटाला पहिले प्राधान्य दिले जाते. असे मानले जाते की या वयात करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न स्थिर राहते आणि भविष्यात तुमची उत्पनात वाढ देखील होऊ शकते. यामुळे तुम्हाला ईएमआय भरणे सोपे जाईल आणि कर्ज देणाऱ्या बँकेची जोखीम कमी होईल.

निष्कर्ष :

घर खरेदी करणे ही एक आर्थिक बांधिलकी आहे आणि गृहकर्ज मिळविणे आव्हानात्मक असू शकते, विशेषत: जेव्हा कर्ज देणारी बँक तुमच्या अर्जाचे काटेकोरपणे पुनरावलोकन करते. मात्र वरील बाबींची काळजी घेतल्यास तुम्हाला कर्ज मिळणे सोपे जाईल आणि कर्जाला मंजुरी मिळण्याची शक्यता वाढेल.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.