शेअर बाजारात सोन्याच्या खरेदी-विक्रीचा मुहुर्त लवकरच; इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावत्यांच्या व्यापाराला सेबीचा हिरवा कंदील
गोल्ड एक्सचेंजसाठी सरकारने पुढेच पाऊल टाकले आहे. शेअर बाजारात सोन्याची खरेदी-विक्री आता प्रत्यक्षात येणार आहे. बाजार नियामक सेबीने बीएसईला इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावत्यांच्या व्यापारासाठी हिरवा कंदील दिला आहे.
देशात सोन्याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील व्यापारात (Gold Exchange) आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनियमन बोर्डाने (SEBI) बीएसईला इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावत्यांच्या व्यापारासाठी हिरवा कंदील दिला आहे. या निर्णयामुळे स्पॉट बुलियन एक्सचेंज(Bullion Exchange) सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थ मंत्रालयाने सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स अॅक्ट, 1956 अंतर्गत इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावत्यांना (EGR) सिक्युरिटीजचा दर्जा दिला. अर्थ मंत्रालयाने सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स अॅक्ट, 1956 अंतर्गत इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावत्यांना (EGR) सिक्युरिटीजचा दर्जा दिला. म्हणजे शेअर्सप्रमाणेच सोन्यातही व्यापार करता येणार आहे. इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावत्यांनाही सोप्या भाषेत कागदी सोने म्हणता येईल. या बाजारात इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावत्या पावती ( EGR ) म्हणून बाजारात सोन्याचा व्यापार केला जाईल. शेअर बाजार (Share Market) ईजीआरमध्ये व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असलेले त्यासाठी अर्ज करू शकतात, असे सेबीने एका परिपत्रकात म्हटले आहे. शेअर बाजार व्यवसाय किंवा ईजीआरचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी वेगवेगळ्या रकमेसह करार सुरू करू शकतात. त्यासाठी आराखडा (Frame Work) तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, ईजीआर तयार करणे, शेअर बाजारात ईजीआरमध्ये व्यापार करणे आणि ईजीआरचे प्रत्यक्ष सोन्यात रूपांतर करणे या तीन टप्प्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
एका महिन्यात गोल्ड एक्सचेंज
आता बीएसईला स्पॉट गोल्ड एक्सचेंज सुरू करण्यासाठी अवघ्या काही महिन्यांचा अवधी लागेल. अर्थमंत्रालयाच्या या निर्णयानंतर सध्याच्या एक्सचेंजवर गोल्ड एक्सचेंजअंतर्गत गुंतवणुकदारांना सोन्याच्या देवाण-घेवाण करता येईल. सोन्याच्या स्वरुपातील ही पहिली वेगळी देवाण-घेवाण असेल. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज (MCX) हा बीएसईचा या भागातील प्रमुख प्रतिस्पर्धी असेल.कारण कमॉडिटीज, विशेषत: बुलियनमध्ये स्पॉट ट्रेडिंग सुरू करण्याची ही अभिनव योजना गुंतवणुकदारांना विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देणार आहे. स्पॉट बुलियन एक्सचेंजसाठी सॉफ्टवेअर घेण्यास उशीर झाल्याने एक्सचेंजचे नुकसान झाले आहे.
स्टॉक एक्सचेंज पर सोने को खरीदना और बेचना अब हकीकत में तब्दील होने वाला है. बाजार नियामक सेबी ने बीएसई को इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स में ट्रेडिंग के लिए हरी झंडी दे दी. @bulandvarun @VipulS1206 pic.twitter.com/4uoHSNMlx9
— Money9 (@Money9Live) February 11, 2022
विश्लेषकांचे म्हणण्यानुसार, बीएसईने कमॉडिटी ट्रेडिंग सुरू केले आहे, परंतु बाजाराने वर्तवलेल्या अंदाजानुसार बीएसई एमसीएक्सला अद्यापही आव्हान देऊ शकलेले नाही. बुलियन फ्युचर्स, क्रूड आणि मेटल्समधील व्यापार ही एमसीएक्सची बलस्थाने आहेत. गेल्या दोन दशकांपासून त्यांच्यी प्रगती सातत्याने होत आहे आणि गुतंवणुकदारांचा या मार्केटवर विश्वास आहे.
सेबीने देशात गोल्ड एक्सचेंज स्थापन करण्याची शेअर बाजारांना मुभा दिली होती. गेल्यावर्षी सेबीने याविषयीची मंजुरी दिली होती. आता या नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सोन्याच्या व्यवहारासाठी इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीटस चा वापर करण्यात येणार आहे. मूल्य निर्धारण करण्यासाठी एक निर्धारित पद्धत अवलंबिण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात गोल्ड एक्सचेंजचे नियमन सीबी करेल असे स्पष्ट केले होते.सोन्याच्या स्वरूपात अथवा सोन्याचे प्रतिनिधित्व म्हणून इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीटस यांचा या गोल्ड एक्सचेंज मध्ये वापर करण्यात येणार आहे. शेअर मार्केट सारखेच तुम्हाला गोल्ड एक्सचेंज मध्ये सोने खरेदी-विक्री आणि ते राखून ठेवण्याची मुभा देण्यात येणार आहे. सोने रुपातील या शेअर बाजारांमध्ये सोन्याच्या व्यवहारांना गतीशीलता मिळवून देण्यासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे. या प्रयोगामुळे डीमॅट खात्यात लक्षणीय वाढ होईल आणि ईजीआरद्वारे सोन्यावर कर्ज घेण्याच्या योजनेला प्रोत्साहन मिळेल असा विश्लेषकांचा अंदाज आहे.