Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसबीआयच्या ‘या’ दोन करंट अकाऊंटवर मिळतात चांगल्या सुविधा; व्यवसायिकांसाठी ऑफर्सची खैरात

आजचे युग हे व्यवसायिक युग आहे. बँका देखील व्यवसायिकरणापासून लांब राहु शकलेल्या नाहीत. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या ऑफर्स देत असतात. काही ऑफर्स या बचत खात्यावर असतात, तर काही ऑफर्स या चालू ख्यात्यावर असतात.

एसबीआयच्या 'या' दोन करंट अकाऊंटवर मिळतात चांगल्या सुविधा; व्यवसायिकांसाठी ऑफर्सची खैरात
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 6:45 AM

मुंबई :  SBI Current Account आजचे युग हे व्यवसायिक युग आहे. बँका देखील व्यवसायिकरणापासून लांब राहु शकलेल्या नाहीत. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या ऑफर्स देत असतात. काही ऑफर्स या बचत खात्यावर असतात, तर काही ऑफर्स या चालू ख्यात्यावर देखील देण्यात येतात. भारताची सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने देखील आपल्या ग्राहकांसाठी विशेष: जे व्यवसायिक आहेत आणि त्यांचे बँकेत करंट अकाऊंट आहे, त्यासाठी काही खास ऑफर दिल्या आहेत या ऑफरबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात.

प्लॅटिनम करंट अकाऊंट (SBI Platinum Current Account) 

एसबीआयचे प्लॅटिनम करंट अकाऊंट अशा ग्राहकांसाठी आहे, ज्यांच्या व्यवसायाची उलाढाल ही कोट्यावधीच्या घरात असते. महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होते. ज्या ग्राहकांचे प्लॅडिनम करंट अकाऊंट आहे, असे ग्राहक बँकेतून  महिन्याला दहा लाखांपर्यंत पैसे काढू शकतात. तसेच एका महिन्यामध्ये ते दोन कोटी रुपयांपर्यंत रक्कम बँकेत जमा देखील करू शकता. हे ग्राहक आपल्या होम ब्रँच मधून एका दिवसामध्ये कितीही रुपये ते पण अगदी फ्रीमध्ये काढू शकतात. तसेच या ग्राहकांना आरटीजीएस आणि एनईएफटी देखील अनलिमिटेड फ्री असते. तसेच तुम्हाला  या स्कीम अंतर्गंत खाते सुरू केल्यास बिजनेस डेबीट कार्ड देखील देण्यात येते.

गोल्ड करंट अकाऊंट (SBI Gold Current Account)

हे खाते  बँकेच्या अशा लोकांसाठी फायद्याचे आहेत, ज्या लोकांचा व्यवयाय आहे. ज्या ग्राहकांचा पैशाच्या देवाण- घेवाणीसाठी सातत्याने बँकेशी संबंध येतो. त्यांच्यासाठी हे खाते फायद्याचे ठरू शकते. तुम्ही या खात्यामधून महिन्याला सरासरी एक लाखांच्या आसपास रक्कम काढ शकता. तसेच दर महिन्याला तुम्ही बँकेमध्ये 25 लाखापर्यंत रक्कम फ्रीमध्ये जमा करू शकता. त्यावर कोणताही चार्ज लागत नाही. तसेच प्लॅटिनम करंट अकाऊंट  प्रमाणेच या खात्यावर देखील आरटीजीएस आणि एनईएफटीची सुविधा देखील मोफत पुरवली जाते.

संबंधित बातम्या 

सोन्या, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

घाऊक महागाईच्या दरात पुन्हा वाढ; अन्नधान्य, भाजीपाला सर्वच गोष्टी महागल्या

देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले; अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका, ग्रामीण भागातील तरुणांचे रोजगाराच्या शोधात स्थलांतर

भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन.
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका.
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका.
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं.
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?.
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले.