जाणून घ्या बचत खात्यांवर सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांबाबत, तुमची बँक यामध्ये आहे का?
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून जगासह देशावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक बँकांनी आपल्या विविध योजनांच्या नियमामध्ये बदल केल्याचे पहायला मिळत आहे. तसेच व्याजदरात देखील बदल करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : गेल्या दीड ते दोन वर्षांपासून जगासह देशावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक बँकांनी आपल्या विविध योजनांच्या नियमामध्ये बदल केल्याचे पहायला मिळत आहे. अनेक बँकांनी मुदत ठेव योजनेवर देण्यात येणाऱ्या व्याजाचे दर कमी केल्याने, मिळणारा परतावा कमी झाला आहे. त्यामुळे सध्या ग्राहक आपला पैसा हा बँकांच्या मुदत ठेव योजनेत न गुंतवता तो बचत खात्यातच ठेवण्यास प्राधान्य देत आहेत. पैसे बतच खात्यात ठेवल्यामुळे ग्राहकांना बँकेकडून विविध लाभ मिळतात. तसेच सध्या अनेक बँका या मुदत ठेव योजनेपेक्षा बचत खात्यावर अधिक व्याज देत आहेत. व्याजदर अधिक असल्याने ग्राहकांना परतावा देखील चांगला मिळतो. विशेष: अनेक छोट्या खासगी बँका अशा आहेत, ज्या मोठ्या खासगी बँक आणि सरकारी बँकांपेक्षा बचत खात्यावर अधिक व्याज देतात. याच बँकांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
या पाच खासगी बँक देतात सर्वाधिक व्याजदर
DCB Bank – डीसीबी बँकेकडू सध्या ग्रहकांना बचत खात्यावर 6.5 टक्के व्याज देण्यात येत आहे. डीसीबी बँकेचा व्याजदर हा इतर बँकांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आहे. डीसीबी बँकेतून तुम्ही सुरुवातील कमीत कमी 2,500 रुपये भरून खाते ओपन करू शकता. खाते ओपन केल्यानंतर तुम्हाला बँकेत मिनीमम बॅलन्स म्हणून कायमस्वरुपी अडीच ते पाच हजार एवढी रक्कम ठेवावी लागते.
Bandhan Bank – बंधन बँकेकडून ग्राहकांना बचत खात्यावर 6 टक्के दराने व्याज देण्यात येते. या बँकेत तुम्ही सुरुवातील 5,000 रुपये भरून खाते सुरू करू शकता. ते ओपन केल्यानंतर तुम्हाला बँकेत मिनीमम बॅलन्स म्हणून कायमस्वरुपी पाच हजार रुपये ठेवावे लागतात.
RBL Bank – आरबीएल बँकेकडून ग्राहकांना बतच खात्यावर सहा टक्के व्याजाने पैसे दिले जातात. तुम्ही सुरुवातीला अडीच हजार रुपये भरून बँकेत खाते ओपन करू शकता. या बँकेत मिनीमम बॅलन्सची अट अडीच हजार एवढी आहे.
Yes Bank – येस बँकेकडून आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर 5. 25 टक्क्याने व्याज दिले जाते. मात्र येस बँकेत ग्राहकांना खाते ओपन करायचे असल्यास सुरुवातीला कमीत कमी दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करावी लागते. एस बँकेत दहा हजार ते पंचवीस हजार एवढी मिनिमम बॅलन्सची अट आहे.
IDFC First Bank – या बँकेकडून ग्राहकांना बचत खात्यावर पाच टक्के दराने व्याज देण्यात येते. तुम्ही कमीत कमी दहा हजार रुपये भरून या बँकेत खाते ओपन करू शकता. या बँकेत मिनीमम बॅलन्ससाठी दहा हजारांची अट आहे. एवढेच नाही तुम्ही जर खासगी कंपनीमध्ये अथवा एखाद्या संस्थेमध्ये कामाला असाल तर वरील सर्व बँका या आपल्या ग्राहकांना सॅलरी खात्याची देखील सुविधा पुरवतात. सॅलरी खात्यांना मिनीमम बॅलन्सची आवशकता नसते.
संबंधित बातम्या
जीवन विमा पॉलिसी 40 टक्क्यांनी झाली महाग, कोणत्या विमा कंपनीने किती वाढविले दर?
शेअर बाजारात या स्टॉकमध्ये कमाईची संधी, या स्टॉकमध्ये आज दिसू शकते तेजी
ICICI बँकेचं ‘डिजिटल’ पाऊल: कस्टम ड्युटी ऑनलाईन, घरबसल्या करा पेमेंट!