सर्वाधिक व्याज देणाऱ्या पाच टॉप RD स्कीम; 50 रुपयांमध्ये खाते उघडा, 8 टक्के व्याज मिळवा
RD Scheme | सरकारी आणि खासगी बँकामध्ये बचत खात्यापेक्षा RD वर निश्चितच जास्त व्याज मिळते. लॉकडाऊनच्या काळात अनेक बँकांनी घरबसल्या RD खाते उघडण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे.
मुंबई: सध्या बँकेतील बचत खात्यांवरील व्याजदर निचांकी पातळीला पोहोचला आहे. अशावेळी अनेकजण रिकरिंग डिपॉझिट( RD) खात्यात गुंतवणूक करुन जास्त व्याज मिळवण्याचा प्रयत्न करतात. सरकारी आणि खासगी बँकामध्ये बचत खात्यापेक्षा RD वर निश्चितच जास्त व्याज मिळते. लॉकडाऊनच्या काळात अनेक बँकांनी घरबसल्या RD खाते उघडण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे.
RD वर व्याज कसे मिळते?
ICICI बँक RD च्या कालावधीनुसार व्याज देते. सहा महिन्यांच्या RD साठी सर्वाधिक कमी 3.50 इतका व्याजदर आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीसाठी 4 टक्के व्याज दिले जाते. तीन ते पाच वर्षांच्या RD साठी सामान्य ग्राहकांना 5.36 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 5.85 टक्के इतके व्याज मिळते. पाच ते दहा वर्षांच्या RD साठी सामान्य ग्राहकांना 5.50 तर ज्येष्ठ नागरिकांना 6.30 टक्के इतके व्याज दिले जाते. मात्र, RD खात्यात वेळेवर प्रीमियम भरला नाहीतर मासिक व्याजाच्या रक्कमेवर हजार रुपयांपाठी 12 रुपये इतकी पेनल्टी आकारली जाते. ही रक्कम मॅच्युरिटीच्या रक्कमेतून कापली जाते.
Axis बँक: Axis बँकेच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 500 रुपये जमा करावे लागतात. कमाल रक्कम जमा करण्याची कोणतीही मर्यादा नाही. Axis बँकेत सहा महिन्यांपासून ते 10 वर्षापर्यंतच्या आरडी स्कीम आहेत. तुम्ही दर महिन्याला 2000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पैसे जमा करत असाल तर बँकेकडून 300 रिवॉर्ड पॉईंटस मिळतात. या खात्यातील पैशांवर 7.5 टक्के इतके व्याज मिळते. ज्येष्ठांसाठी हा व्याजदर 8 टक्के इतका आहे.
लक्ष्मी विलास बँक- लक्ष्मी विलास बँकेत तुम्ही 100 रुपयांपासून रिकरिंग डिपॉझिट खात्यात गुंतवणूक करु शकता. लक्ष्मी विलास बँकेत एका वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतच्या आरडी स्कीम आहेत. याठिकाणी तुम्हाला 7.5 टक्के इतके व्याज मिळते.
कॅनरा बँक- कॅनरा बँकेत तुम्ही 50 रुपयांपासून रिकरिंग डिपॉझिट खात्यात गुंतवणूक करु शकता. कॅनरा बँकेत सहा महिन्यांपासून ते 10 वर्षापर्यंतच्या आरडी स्कीम आहेत. तुम्ही आरडी खात्यावर कर्जही घेऊ शकता. याठिकाणी तुम्हाला 7.75 टक्के इतके व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांना 7.80 टक्क व्याज मिळते.
रेपको बँक- या बँकेत फिक्स्ड आणि फ्लेक्सिबल अशा दोन प्रकराच्या रिकरिंग डिपॉझिट योजना आहेत. फिक्स्ड डिपॉझिट योजनेत ग्राहकांना मॅच्युरिटीच्यावेळी पैसे दिले जातात. तर फ्लेक्सिबल डिपॉझिट योजनेत ग्राहकांना तर तीन महिन्यांनी व्याज दिले जाते. या बँकेत आरडीवर 7.5 टक्के व्याज मिळते.
आयसीआयसीआय बँक- ICICI बँकेने मोबाईल App च्या माध्यमातून RD खाते खोलण्याची सुविधा देऊ केली आहे. त्यासाठी तुम्हाला हे App स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करावे लागेल. ICICI बँक RD च्या कालावधीनुसार व्याज देते. सहा महिन्यांच्या RD साठी सर्वाधिक कमी 3.50 इतका व्याजदर आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीसाठी 4 टक्के व्याज दिले जाते. तीन ते पाच वर्षांच्या RD साठी सामान्य ग्राहकांना 5.36 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 5.85 टक्के इतके व्याज मिळते. पाच ते दहा वर्षांच्या RD साठी सामान्य ग्राहकांना 5.50 तर ज्येष्ठ नागरिकांना 6.30 टक्के इतके व्याज दिले जाते.
मात्र, RD खात्यात वेळेवर प्रीमियम भरला नाहीतर मासिक व्याजाच्या रक्कमेवर हजार रुपयांपाठी 12 रुपये इतकी पेनल्टी आकारली जाते. ही रक्कम मॅच्युरिटीच्या रक्कमेतून कापली जाते.
संबंधित बातम्या:
SBI नंतर या बँकेचा मोठा निर्णय; ATM, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल
ग्रामीण भागात कमाईची सुवर्णसंधी; ‘या’ सरकारी योजनेचा लाभ घेऊन कमवा पैसे