होम लोन घेतलंय, मग ‘या’ तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Home loan | तुमचा रिपेमेंट रेकॉर्ड आणि क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कर्ज ट्रान्सफर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला केवळ एक फॉर्म भरून केवायसी आणि इतर कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. त्यानंतर तुमचे लोन ट्रान्सफर होईल.

होम लोन घेतलंय, मग 'या' तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
एसबीआयची कोट्यवधी ग्राहकांना भेट, कर्ज केले स्वस्त
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 10:01 AM

नवी दिल्ली: घर खरेदी हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा भाग असला तरी त्यानंतर फेडावे लागणारे गृहकर्जाचे हप्ते ही बहुतांश लोकांसाठी एकप्रकारची टांगती तलवार असते. तुम्ही गृहकर्जावर पाच लाख रुपयांपर्यंत करमाफी मिळवू शकता. मात्र, गृहकर्जाचे हप्ते वेळेवर फेडले नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. गृहकर्ज फेडण्यासाठी साधारण 15 ते 20 वर्षांचा अवधी लागतो. या काळात परिस्थिती कशीही असो तुम्हाला गृहकर्जाचे हप्ते फेडावेच लागतात. त्यामुळे गृहकर्ज घेतल्यानंतर काही गोष्टींचे भान बाळगणे गरजेचे आहे.

बॅलन्स ट्रान्सफर

होम लोनवरील व्याजदर हा नेहमी वरखाली होत राहतो. सुरुवातीच्या काळात हाऊसिंग फायनान्स कंपन्या स्वस्तात लोन द्यायच्या. तर बँकांचे कर्ज महाग होते. मात्र, आता हे चित्र उलटे झाले आहे. बँका स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करुन देत असल्यामुळे हाऊसिंग फायनान्स कंपन्या तोट्यात जात आहेत. अनेकजण हाऊसिंग फायनान्स कंपन्यांमधील कर्ज बँकेत ट्रान्सफर करत आहेत. हा पर्याय वापरून तुम्हाला कमी व्याज भरावे लागत असेल तर हा पर्याय नक्की निवडावा.

तुमचा रिपेमेंट रेकॉर्ड आणि क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कर्ज ट्रान्सफर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला केवळ एक फॉर्म भरून केवायसी आणि इतर कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. त्यानंतर तुमचे लोन ट्रान्सफर होईल.

फोरक्लोजर

तुम्हाला खूप व्याज भरावे लागत असेल आणि तुमच्याकडे एकरकमी पैसे असतील तर तुम्ही मुदतीआधीच कर्ज फेडू शकता. जेणेकरून तुमच्या डोक्यावरील टांगती तलवार कायमची दूर होईल.

तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढेच कर्ज फेडले तरी हरकत नाही. कर्जाची मूळ रक्कम कमी झाल्यास साहजिकच तुमचे व्याजही कमी होईल. त्यामुळे तुम्हाला कमी रकमेचा हप्ता भरावा लागेल. लोन फोरक्लोझरसाठी केवायएसी आणि इतर कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. लोन फोरक्लोजर करताना तुमच्या मालमत्तेची कागदपत्र बँकेकडून घ्यायया विसरु नका.

टॉप अप लोन

तुम्ही गृहकर्जावर टॉप अप लोनही घेऊ शकता. तुम्हाला त्यासाठी एक फॉर्म आणि केवायसी बँकेत जमा करावे लागतील. यामध्ये ओळखपत्र, एड्रेस प्रुफ, उत्पन्नाचा दाखला आणि टायटल डीड जमा करावे लागेल. टॉप अप लोनसाठी बँकेकडून प्रोसेसिंग फी घेतली जाते. टॉप अप लोनचा व्याजदर हा होम लोनपेक्षा जास्त असतो.

संबंधित बातम्या:

Budget 2021 : होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आणखी एक वर्ष व्याजावर दीड लाखांची अ‍ॅडिशनल सूट मिळणार

SBI ची धमाकेदार ऑफर, free मध्ये मिळणार सगळ्यात महत्त्वाच्या सुविधा

Home Loan : कोटक महिंद्रा बँक देतेय सर्वात स्वस्त कर्ज? जाणून घ्या व्याजदर

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.