ना खुशी, ना गम: कमाईचं चीज, पैसे खर्चाच्या ‘5’ आदर्श पद्धती
तुमच्या दैनंदिन गरजा वेतनातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मात्र, तुमच्या इच्छा तसेच स्वप्नासाठी पगार व्यतिरिक्तचे उत्पन्न वापरा. लाभांशातून मिळणाऱ्या रकमेतून सुट्टीत फिरण्याचे नियोजन आखा. तुमच्या स्थिर संपत्तीतून काही उत्पन्न मिळत असल्यास मोबाईल रिचार्ज, कपडे आदींवर खर्च करा.
नवी दिल्ली– पैसे कमाईच्या कल्पना एका क्लिकवर उपलब्ध आहेत. तुम्हाला नोकरीपासून ते लहान-मोठ्या उद्योगाच्या कल्पनांची शिफारस नक्कीच केली असणार. उत्पन्नासोबत खर्चाचे गणित जुळविण्यासाठी परिपूर्ण आर्थिक व्यवस्थापन गरजेचे ठरते.पैसा कुठे व कसा खर्च करावा याचा मेळ साधला की समीकरण जुळतात. आम्ही तुम्हाला पैसे खर्च करण्याच्या पाच पद्धती सांगणार आहोत.
1. वेतन व्यतिरिक्तची कमाई वापरा
तुमच्या दैनंदिन गरजा वेतनातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मात्र, तुमच्या इच्छा तसेच स्वप्नासाठी पगार व्यतिरिक्तचे उत्पन्न वापरा. लाभांशातून मिळणाऱ्या रकमेतून सुट्टीत फिरण्याचे नियोजन आखा. तुमच्या स्थिर संपत्तीतून काही उत्पन्न मिळत असल्यास मोबाईल रिचार्ज, कपडे आदींवर खर्च करा. तुम्ही पार्ट टाइम करत असल्यास त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून वरील खर्चाचे नियोजन करा.
2. स्वतःलाही महत्व द्या
प्रत्येकजण स्वतःपेक्षा परिवाराच्या आनंदाला महत्व देतो. मात्र, स्वतः कडे नेहमी दुर्लक्ष करतात. कमवत्या व्यक्तीने स्वतःलाही तितकचं महत्व द्यायला हवं. जितकं अन्य व्यक्तींना दिले जाते.
3. पैसे खर्चाशी तडजोड नको
नेहमी आवश्यक तिथे खर्च करण्यासाठी तडजोड करू नका. तुम्ही परिवारासोबत फिरायला गेल्यास आवश्यक तिथे नक्कीच खर्च करा. अन्यथा, समान गोष्टीसाठी भविष्यात अधिक पैसे खर्च करावे लागतील. आवश्यक तिथे योग्य प्रमाणात पैसे खर्च करण्याचे तत्व नेहमीच पाळा.
4.धर्मादाय कामे करा
तुम्ही केवळ स्वतः किंवा परिवारावर पैसे खर्च करणे टाळा. तुमच्या अवतीभोवती असलेल्या गरजू व्यक्तीवर नेहमीच खर्च करा. सण-उत्सव या काळात गरजूंना नेहमी मिठाई, भेटवस्तू द्या. तुमच्या घरातील कामगारांना भेट स्वरुपात प्रोत्साहन द्या. पैसे खर्च करताना नेहमी परताव्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला मिळणारी आत्मसमाधानाची भावना सुखकारक असेल.
5. पिढीची अनावश्यक चिंता टाळा
पुढच्या पिढीच्या भविष्याची नेहमीच चिंता असते. त्यामुळे संपत्तीच्या विनियोगातून भावी पिढीसाठी पुंजी जमविण्यासाठी प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. मात्र, पर्याप्त मर्यादेच्या बाहेर संपत्तीचा संचय टाळा. तुमचेच पैसे खर्च करण्यासाठी मुलांची वारंवार परवानगी घेऊ नका. अन्यथा, भावी पिढीला पैशाची किंमत राहणार नाही.