Gold Price : सोने-चांदीचे दर किती कमी होणार? इंधनाची किंमत किती वाढणार? वाजा तज्ज्ञांची मतं

सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना सोन्याची पडझड सुरुच राहणार का? आगामी काळात या दोन्ही धातुंच्या किमतीचं भविष्य काय असेल याबाबत साशंकता आहे.

Gold Price : सोने-चांदीचे दर किती कमी होणार? इंधनाची किंमत किती वाढणार? वाजा तज्ज्ञांची मतं
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 8:47 PM

मुंबई : सोने-चांदीच्या दरात मागील काही दिवसांपासून सातत्याने पडझड होतेय. बाजारात सोने खरेदीचं प्रमाणही घटलंय. सोन्यासोबतच चांदीचंही तसंच पाहायला मिळतंय. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना सोन्याची पडझड सुरुच राहणार का? आगामी काळात या दोन्ही धातुंच्या किमतीचं भविष्य काय असेल याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे इंधनाने गगनाला गवसणी घातलीय. पेट्रोलने केव्हाच 100 रुपयांचा टप्पा पार करुन सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. त्यामुळे महागाईने नागरिक होरपळून निघत आहेत. या इंधन दरवाढीचंही पुढे काय होणार याबाबतही अनेकांना प्रश्न आहेत. याचाच हा खास आढावा (Know future of Gold silver petrol diesel price according to experts).

अमेरिकेच्या आर्थिक धोरणांचा कायमच सोन्याच्या किमतीवर परिणाम झालेला पाहायला मिळालाय. यावेळी देखील अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने त्यांचं आर्थिक धोरण जाहीर केल्यानंतर सोन्याचे दर कमी झालेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने 2023 पर्यंत दोन वेळा व्याजदरात बदल करण्याचे सुतोवाच केलंय. त्याचा परिणाम सोने चांदीच्या खरेदीवर आणि दरावर पडलाय. अनेक गुंतवणूकदार सोने चांदीत गुंतवणूक करण्याबाबत सावध भूमिका घेत आहेत. त्यामुळेच देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदी दरांमध्ये घट होत आहे.

आगामी काळात सोने चांदीचे दर कसे असणार?

तज्ज्ञांच्या मते, “भारतात सध्या कोणताही उत्सव किंवा सण नाही. याशिवाय खरेदी विक्रीचा लग्नाचा काळही संपलाय. तसेच सोन्यावरील हॉलमार्किंगचे नियम लागू झालेत. या सर्वांचा सोन्याच्या बाजारावर परिणाम झालाय. त्यामुळे आगामी काळात सोने आणि चांदीचे दर स्थिर राहतील किंवा कमी होतील. भारतातील गुंतवणूकदार सध्या सोने चांदीच्या किमती आणखी कमी होण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे सोने दरात जशी वेगाने पडझड होईल तशी गुंतवणूक वाढून या किमती पुन्हा वेगाने वाढतील. त्या परिस्थितीत सोन्याच्या दरात थोडीशी सुधारणा होईल. मात्र, सध्यातरी तशी कोणतीही स्थिती नाही. चांदीच्या दरातही अशाचप्रकारे वाढ होताना दिसेल. बाजार खुले झाल्यास चांदीची औद्योगिक मागणी वाढेल. त्यामुळे चांदीचे दरही वाढतील.”

इंधन दरवाढ सुरुच राहणार

कोरोना लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनचे निर्बंध कमी होतील आणि सर्व व्यवहार सुरळीत होऊन इंधनाची मागणी वाढेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीही वाढलीत. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरातही वाढ झालेली पाहायला मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात जसे इंधन दर वाढतात, तसं कच्च्या तेलाचं उत्पादन देखील वाढवलं जातं. उत्पादन वाढलं की पुरवठा सुरळीत होऊन कच्च्या तेलाच्या किमती कमी होतात. तज्ज्ञांनी आगामी काळात ब्रेंटमध्ये 80 डॉलर प्रति डॉलरपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. अनुज गुप्ता यांनी इंधनाचे दर 5 हजारपासून 5700 रुपये प्रति बॅरलपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा :

Gold Rate Today : जळगावात सोनेदरात तब्बल दीड हजारपेक्षा अधिक रुपयांनी घसरण, तोळ्याचा भाव किती?

Gold Hallmarking | सराफा व्यापारांना मोठा दिलासा, हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांच्या दंडाबद्दल मोठा निर्णय

सोनं खरं की खोटं कसं ओळखाल? आता प्रत्येक दागिण्यावर ‘ही’ 4 चिन्ह पाहा, उत्तर मिळेल

व्हिडीओ पाहा :

Know future of Gold silver petrol diesel price according to experts

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.