आधारकार्ड घरी विसरलात? आता स्मार्टफोनमध्येच ठेवा आधारकार्ड, कसे कराल डाऊनलोड
सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. (Know How to Download Aadhaar Card in smartphone)
मुंबई : सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे. त्यामुळे सतत तुमच्याकडे आधार कार्ड बाळगणे खूप महत्त्वाचे असते. (Know How to Download Aadhaar Card in smartphone)
पण अनेकदा आपण घाई गडबडीत घरीच आधार कार्ड विसरतो आणि एखाद्या दूरच्या ठिकाणी गेल्यावर जर तुम्ही आधार कार्ड विसरला असाल, तर फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते. जर तुम्हीही अशाप्रकारे घरी आधारकार्ड विसरला असाल, तर काळजी करण्याचे काहीही कारण नाही. आता तुम्ही तुमचे आधारकार्ड स्मार्टफोनसोबत घेऊन फिरु शकणार आहात. तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना.. हे कसे काय शक्य आहे. यासाठी तुम्हाला फोनमध्ये फक्त एक गोष्ट करावी लागेल, ज्यामुळे तुमचे आधार कार्ड नेहमीच तुमच्यासोबत राहिल.
आधारकार्डची डाऊनलोड फाईल मान्य
बाहेर जातेवेळी तुमच्या फोनमध्ये आधारकार्ड डाऊनलोड करणे हा योग्य निर्णय आहे. यामुळे तुम्हाला गरजेच्यावेळी पर्समध्ये आधार कार्डची शोधाशोध करावी लागणार नाही. तसेच जर तुम्ही ते विसरलात तरी कोणतीही अडचण येणार नाही.
आधार कार्ड जारी करणारे भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीने (UIDAI) ने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड केलेले आधारकार्ड हे सुरक्षित आणि सर्वत्र वैध आहे. ते कुठेही स्वीकारले जाऊ शकते. त्याची मान्यता ही मूळ आधार कार्डाइतकीच आहे.
कसे कराल डाऊनलोड?
1. ई-आधारकार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम https://eaadhaar.uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. 2. त्या ठिकाणी तुम्हाला आधारकार्ड डाऊनलोड असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. 3. यानंतर तुमच्या रजिस्टर नंबरवर वेरिफिकेशनसाठी OTP येईल. तो त्यात भरा. 4. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तर द्या. 5. यानंतर तुम्हाला डाऊनलोड करण्याचा पर्याय मिळेल. 6. तिथे क्लिक करुन आधारकार्ड डाऊनलोड करा. 7. हे आधारकार्ड डाऊनलोड झाल्यानंतर ती फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पासवर्डची गरज लागेल. 8. हा पासवर्ड तुमच्या नावाच्या सुरुवातीची चार अक्षरे (Capital) आणि त्यापुढे तुमची वाढदिवसाची तारीख असा असेल.
MS धोनीपासून केन विल्यमसनपर्यंत, नवं रणांगण, नवा बादशाह, 7 टूर्नामेंट, प्रत्येक वेळी नवा विजेता!https://t.co/Y97dyGmMuh#MSDhoni #KaneWillamson #ICC #worldcup #INDvsNZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 25, 2021
(Know How to Download Aadhaar Card in smartphone)
संबंधित बातम्या :
PF Account : कसा काढायचा पेन्शनमध्ये जमा झालेला हिस्सा? या अटी कराव्या लागतील पूर्ण
तुमच्याकडे एक रुपयांचं नाणं आहे का? मग तुम्हीही रातोरात होऊ शकता लखपती
Post Office च्या योजनेत 1045 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवेळी वारसदाराला 14 लाख रुपये मिळणार