रेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय? मग IRCTC च्या ‘या’ अॅपवरुन बुकिंग करा

रेल्वेचं तिकिट रद्द केलं की बहुतांश वेळा तिकिटाचे पैसे परत मिळण्यासाठी खूप वेळ लागतो. अनेक प्रवासी तर पैसे परत न आल्याच्याही तक्रारी करतात. अनेकांना तर उशिराने आपले पैसे मिळत असल्यानं ते पैसे आलेत की नाही हेही आठवत नाही.

रेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय? मग IRCTC च्या 'या' अॅपवरुन बुकिंग करा
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 5:38 AM

मुंबई : रेल्वेचं तिकिट रद्द केलं की बहुतांश वेळा तिकिटाचे पैसे परत मिळण्यासाठी खूप वेळ लागतो. अनेक प्रवासी तर पैसे परत न आल्याच्याही तक्रारी करतात. अनेकांना तर उशिराने आपले पैसे मिळत असल्यानं ते पैसे आलेत की नाही हेही आठवत नाही. मात्र, आता हा प्रश्न सुटणार आहे. भारतीय रेल्वेने एक खास अॅप लाँच केलंय. जर तुम्हालाही तिकिट रद्द केल्यावर तातडीने पैसे रिफंड मिळवायचे असतील तर या अॅपचा उपयोग फायद्याचा ठरेल. IRCTC च्या या अॅपचा वापर केल्यास प्रवाशांना क्षणात त्यांच्या तिकिटाचे पैसे परत मिळणार आहेत. त्यासाठी 2-3 दिवस वाट पाहत बसण्याची आवश्यकता नाही (Know how to get immediate refund after cancellation of railway ticket).

रेल्वेच्या या नव्या अॅपचं नाव IRCTC-iPay असं आहे. या अॅपमुळे तिकिट रद्द केल्यानंतरची रक्कम तातडीने तुम्हाला मिळणार आहे. याआधी ऑनलाईन तिकिट रद्द केल्यास त्याचे पैसे मिळण्यास प्रवाशांना 48-72 तासांची वाट पाहावी लागायची.

IRCTC-iPay वरुन तिकिट बुक कसं कराल?

  • आयपे अॅपवरुन तिकिट बुकिंग करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी www.irctc.co.in वर लॉगिन करावं लागेल.
  • तेथे तुमच्या प्रवासाची दिनांक, ठिकाणाची माहिती भरा.
  • आपल्या मार्गाप्रमाणे रेल्वे गाडीची निवड करा.
  • तिकिटाचे पैसे अदा करताना तेथे पहिला पर्याय ‘IRCTC iPay’ दिसेल.
  • या पर्यायावर क्लिक करुन Pay and Book वर क्लिक करा.
  • आता पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा यूपीआयचा प्रर्यायही आहे.
  • पेमेंट झालं की तुम्हाला लगेच तिकिट बूक झाल्याचा एसएमएस आणि ईमेल येईल.

हेही वाचा :

रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची विशेष सुविधा; तिकीट कॅन्सल केल्यावर लगेच मिळणार रिफंड

प्लॅटफॉर्म तिकिटावरही ट्रेनमध्ये प्रवास करता येतो? अचानक गाडी सुरू झाल्यास काय करायचं?

IRCTC वरुन ट्रेन, फ्लाईट बूक केली, आता बाईकही बूक करण्याची संधी, ‘ही’ ट्रिप तुमचा आनंद द्विगुणीत करेल

व्हिडीओ पाहा :

Know how to get immediate refund after cancellation of railway ticket

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.