तुम्ही तुमच्या PF खाते आणि UAN ची माहिती नाहीये? मग ‘या’ ऑनलाईन टीप्सचा वापर करा

बऱ्याचदा अनेकांचे पगारातून पैसे कपात होऊनही त्यांना आपल्या पीएफ खात्याची माहितीच नसते आणि असली तरी त्याचे तपशील विस्मरणात गेलेले असतात. अशा सर्वांसाठी आपल्या पीएफ खात्याची माहिती मिळवण्यासाठीच्या खास टीप्स.

तुम्ही तुमच्या PF खाते आणि UAN ची माहिती नाहीये? मग 'या' ऑनलाईन टीप्सचा वापर करा
EPFO subscribers
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 9:46 PM

नवी दिल्ली : तुम्ही पगारी नोकरदार असाल आणि तुमच्या पगारातून भविष्य निर्वाह निधी (PF) कपात होत आली असेल तर याचा अर्थ तुम्ही पीएफ खातेधारक आहात. बऱ्याचदा अनेकांचे पगारातून पैसे कपात होऊनही त्यांना आपल्या पीएफ खात्याची माहितीच नसते आणि असली तरी त्याचे तपशील विस्मरणात गेलेले असतात. अशा सर्वांसाठी आपल्या पीएफ खात्याची माहिती मिळवण्यासाठीच्या खास टीप्स (Know how to get information about UAN of PF account balance).

प्रत्येकाच्या पीएफ खात्याला एक युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) असतो. याच युएएनच्या मदतीने कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यात जमा केला जातो. तुम्हाला तुमच्या खात्यावर किती पैसे जमा आहे हे समजून घेण्यासाठी देखील हाच UAN सक्रिय करावा लागतो. विशेष म्हणजे हा खास UAN तुम्ही कंपनी बदलली तरी एकच ठेऊन तुमच्या नोकरीच्या काळातील सर्व पीएफ रक्कम एकाच जागेवर जमा होते. त्यासाठी तुम्ही नव्या ठिकाणी कामावर गेल्यावर तुम्हाला तेथे तुमचा आधीचा UAN तेथे द्यावा लागेल.

तुमचा UAN कसा माहिती कराल?

तुम्हाला तुमच्या UAN ची माहिती तुमच्या पे स्लीपवर (Pay Slip) सहजपणे मिळू शकेल. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या एचआर किंवा अकाऊंटंटकडूनही हा नंबर मिळवू शकता. याशिवाय तुम्ही ईपीएफओच्या यूएएन पोर्टलवर जाऊनही ऑनलाईन पद्धतीने तुमचा UAN माहिती करुन घेऊ शकता.

UAN सेवांशी संबंधित EPFO च्या यूनिफाईड मेंबर पोर्टलवर केल्यावर UAN Status हा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल. इथं तुम्हाला तुमचा कामाच्या ठिकाणचा आयडी किंवा ईपीएफ खाते क्रमांक, नाव, जन्म दिनांक, मोबाईल फोन नंबर आणि ईमेल अशी माहिती द्यावी लागेल. ईपीएफ आयडी तुम्हाला पे स्लिपवरही मिळेल.

UAN ऑनलाईन पद्धतीने सक्रीय कसा कराल?

  • EPFO वेबसाईटवर जाऊन Services मेन्यूमध्ये For Employee ऑप्शनवर क्लिक करा.
  • यानंतर Services पेजवर Member UAN/Online Service ऑप्शनवर क्लिक करा.
  • यानंतर स्क्रीनवर एक लॉग इन पेज येईल. त्याच्या खाली अॅक्टिवेट युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) पर्यायावर क्लिक करा.
  • इथं UAN नंबर, जन्मदिनांक, मोबाईल नंबर आणि कॅप्चे टेक्स्ट टाकल्यानंतर Get Authorization Pin वर क्लिक करा
  • तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो वेबसाईटवर टाकून I Agree वर क्लिक करा. यानंतर तुमचा UAN सक्रीय होईल.

UAN सक्रीय होण्यासाठी कमीत कमी 6 तास लागतात. यानंतर तुम्ही PF अकाऊंटशी संबंधित कामं करू शकता. तुम्ही मेसेज करुनही तुमच्या PF खात्याची माहिती मिळवू शकता. त्यासाठी UAN ला नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवरुन 7738299899 वर EPFOHO UAN लिहून SMS पाठवा.

हेही वाचा :

सलग 5 वर्षे नोकरीनंतर पीएफ रक्कम काढणं करमुक्त? वाचा सविस्तर…

ऑफिस वेळेशिवाय 30 मिनिटांपेक्षा अधिक काम केल्यास कंपनीला ओव्हरटाईम द्यावा लागणार, काय आहेत नियम?

तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा आहेत? या नंबरवर मेसेज करुन एका मिनिटात माहिती मिळवा

व्हिडीओ पाहा :

Know how to get information about UAN of PF account balance

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.