थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार पाठवायचेय, जाणून घ्या ऑनलाईन प्रक्रिया

PM Modi | पंतप्रधान कार्यालयात तक्रार करण्यासाठी प्रथम https://www.pmindia.gov.in/hi या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर पंतप्रधानांशी संवाद साधण्याच्या पर्यायावर क्लिक करा.

थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार पाठवायचेय, जाणून घ्या ऑनलाईन प्रक्रिया
पंतप्रधान मोदी
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 12:22 PM

नवी दिल्ली: एखाद्या कामासाठी सरकारी कार्यालयात खेटे मारूनही ते काम पूर्ण न होण्याची बाब काही नवीन नाही. सरकारी बाबूंचा आळशीपणा आणि दुर्लक्षामुळे सामान्य लोकांची अनेक कामं अडकून पडतात. अशा परिस्थितीत सामान्य लोकांनी नक्की कोणाकडे तक्रार करायची, असा प्रश्न उपस्थित होतो. (Know how you can complaint to PM Narendra Modi office and know full process)

मात्र, आता सामान्य लोकही वरिष्ठ अधिकाऱ्यांची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडे करु शकतात. त्यासाठी तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन तक्रार पाठवता येईल. या तक्रारीत तथ्य आढळल्यास थेट पंतप्रधान कार्यालयाकडून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल.

पंतप्रधान कार्यालयात तक्रार कशी कराल?

पंतप्रधान कार्यालयात तक्रार करण्यासाठी प्रथम https://www.pmindia.gov.in/hi या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर पंतप्रधानांशी संवाद साधण्याच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. त्यासोबत संबंधित कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल.

पत्राद्वारेही तक्रार करू शकता

ज्यांना कॉम्प्युटर हाताळता येत नसेल ते लोक पत्र लिहूनही पंतप्रधान मोदींपर्यंत आपली तक्रार पोहोचलू शकतात. त्यासाठी प्रधान मंत्री कार्यालय, साउथ ब्लॉक, नवी दिल्ली, पिन – 110011, या पत्यावर पत्र पाठवावे. तसेच FAX No. 011-23016857 या फॅक्स नंबरवरही तुम्हाला तक्रार पाठवता येईल.

कशाप्रकारे होती कारवाई?

पंतप्रधान कार्यालयात दररोज अनेक तक्रारी येत असतात. या तक्रारींसंदर्भात कारवाई करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात एक टीम काम करते. याशिवाय, CPGRAMS माध्यमातूनही तक्रारींचे निवारण करता येते.

(Know how you can complaint to PM Narendra Modi office and know full process)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.