चुकवाल तर फसाल: EMI वेळेवर भरणं का हिताचं? जाणून घ्या- तज्ज्ञांचं मत

क्रेडिट स्कोअर कमी असणाऱ्या कर्जदारांना अधिक व्याजदराने कर्ज पुरवठा केला जातो. तसेच कर्ज प्रस्ताव नामंजूर करण्याची शक्यता देखील नाकारली जात नाही.

चुकवाल तर फसाल: EMI वेळेवर भरणं का हिताचं? जाणून घ्या- तज्ज्ञांचं मत
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 5:23 PM

नवी दिल्ली- आपल्या हक्काचा निवाऱ्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. फ्लॅट (Flat) किंवा प्लॉट (Plot) खरेदीचा मार्ग गृह कर्जाद्वारे (Home Loan) सुकर होतो. मात्र, मुदतीच्या आत कर्जाची परतफेड (Repayment of Home Loan) करण्यासाठी बारकाईने आर्थिक नियोजन (Financial Planning) महत्वपूर्ण ठरते. गृह कर्जाच्या मासिक हफ्त्यांना किंवा ईएमआयला (Home Loan EMI) विलंब झाल्यास कर्जदाराला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. रिझर्व्ह बँकेचे रेपो रेट आणि कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर यावर बँकेच्या कर्जाचे व्याजदर ठरतात. त्यामुळे क्रेडिट स्कोअर कमी असणाऱ्या कर्जदारांना अधिक व्याजदराने कर्ज पुरवठा केला जातो. गृहकर्ज आणि ईएमआय याविषयी महत्वाची माहिती बँक बाजारचे (Bankbazaar.com) सीईओ आदिल शेट्टी यांनी दिली आहे. गृह कर्जाच्या विलंबाचे तोटे स्पष्टीकरणासह मांडले आहेत.

विलंबास दंडाचा भुर्दंड:

तुम्ही गृहकर्जाचा ईएमआय अदा करण्यास सलग तीन महिने विलंब केल्यास बँकेकडून रिमाईंडर पाठविले जाते. मात्र, तीन महिन्यांहून अधिक काळ ईएमआय थकित असणे गंभीर समजले जाते. आस्थापन विषयक कायद्यांनुसार सलग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी ईएमआय थकल्यास कर्जपुरवठादाराकडून नोटीस पाठविली जाते.

ईएमआयला विलंब झाल्यास दंडात्मक शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागतो. प्रत्येक बँकेनुसार दंडाची रक्कम व आकारणी पद्धत विभिन्न असते. अधिक काळ थकित राहिल्याच्या स्थितीत बँकेद्वारे कर्जाला एनपीएमध्ये वर्ग केले जाते आणि विविध साधनांचा वापर करुन कर्ज रिकव्हरी प्रक्रिया सुरु केली जाते. यामध्ये संपत्तीची लिलाव देखील समाविष्ट असू शकतो.

क्रेडिट स्कोअर ‘डाउन’:

गृह कर्जाच्या ईएमआयच्या अनियमित परतफेडीमुळे क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. कर्जदार वारंवार ईएमआय थकित ठेवत असल्यास त्याचा क्रेडिट स्कोअरच्या रेटिंगमध्ये घसरण होते. बहुतांश बँका नियमित अंतराने आपल्या व्याजदराची पुर्नरचना करतात. रिझर्व्ह बँकेचे रेपो रेट आणि कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर यावर बँकेच्या कर्जाचे व्याजदर ठरतात. त्यामुळे क्रेडिट स्कोअर कमी असणाऱ्या कर्जदारांना अधिक व्याजदराने कर्ज पुरवठा केला जातो. तसेच कर्ज प्रस्ताव नामंजूर करण्याची शक्यता देखील नाकारली जात नाही.

बँकिंग व्यवहारावर परिणाम

तुम्ही तुमचे कर्ज अन्य बँका किंवा वित्तीय संस्थात (Bank or Financial Institution) ट्रान्सफर (Loan Transfer) करू इच्छित असल्यास, नवीन कर्जपुरवठा करणारी बँक किंवा संस्थेद्वारे मागील क्रेडिट रेकॉर्डमुळे (Repayment History) अर्ज रद्द केला जाऊ शकतो. याप्रमाणेच कर्जदाराला अन्य श्रेणी जसे की वैयक्तिक कर्ज (Personal Loan), कारसाठी कर्ज (Car Loan) आदी साठी नवं कर्ज (New Loan) प्राप्त करण्यात समस्या निर्माण होऊ शकते.

Indian Railways : दिल्लीला ट्रेननं जायचा विचार करताय? अनेक गाड्या उशिरानं; थंडी आणि धुक्याचा कहर सुरुच

Dolo 650 : कोरोनाच्या लसी इतकीचं डोलो-650 ची चर्चा, कंपनीनं काय प्लॅनिंग केलं, मायक्रो लॅब्सचे MD म्हणाले…

Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर करताना ‘या’ चुका टाळा, अन्यथा फटका ठरलेला

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.