घर खरेदीसाठी मान्सून सगळ्यात चांगली वेळ, कधीही फसवणूक होणार नाही, कारण काय?
आपलं स्वप्न असलेलं घर खरेदी करताना खूप गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सतर्क राहून घर खरेदी केलं तरच फसवणूक टाळता येईल. यासाठी मान्सूनचा काळ चांगला असल्याचं मत जाणकार व्यक्त करतात.
मुंबई : प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं हक्काचं घर असावं असं. मात्र, हे घर घेण्यासाठी अनेकांचं आयुष्य निघून जातं. अनेकदा घर खरेदी करुनही फसवणूक झाल्याचे प्रकारही समोर येतात. म्हणूनच आपलं स्वप्न असलेलं घर खरेदी करताना खूप गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सतर्क राहून घर खरेदी केलं तरच फसवणूक टाळता येईल. यासाठी मान्सूनचा काळ चांगला असल्याचं मत जाणकार व्यक्त करतात. आता हे ऐकून तुम्हाला घर खरेदी आणि मान्सूनचा काय संबंध असा प्रश्नही पडला असेल. तर चला पाहुयात घर खरेदीसाठी मान्सून उत्तम का? (Know the benefits of house or land buying in monsoon)
1. घराची जागा आणि ठिकाण याची अचूक माहिती कळते
तुम्ही इतर हंगामात जागा किंवा घर पाहण्यास गेलात तर तिथं तुम्हाला सगळंच व्यवस्थित दिसण्याची शक्यता असते. मात्र, मान्सूनमध्ये तुम्ही संबंधित ठिकाणाची पाहणी केली तर त्या जागेच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींची तुम्हाला माहिती होते. मान्सून काळात पाऊस होऊन खोलगट भागात पाणी साचते. जिथं ओढे नाले बुजलेले आहेत तेथे ते उघडे होतात. तसेच त्या त्या भागातील ड्रेनेज व्यवस्था कशी आहे याचीही माहिती कळते. यामुळे तुम्ही घर घेत असलेल्या भागाची पावसाळ्यातील स्थिती तुम्हाला अचूक समजते. त्यावरुन तेथे किती पाणी साचते, वाहतुकीचे काही अडथळे तर नाही ना, तुमचं घर उंचीवर आहे, खड्ड्यात आहे की कोठे हेही स्पष्ट होतं. त्यामुळे नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.
2. फ्लॅट किंवा काम पूर्ण झालेलं घर खरेदीत मदत
जर तुम्हाला फ्लॅट किंवा थेट राहायला जाता येईल असं (रेडी टू शिफ्ट) घर खरेदी करायचं असेल तर मान्सूनची मदत होते. अनेकदा जुन्या घरांना वरवरची मलमपट्टी करुन रंग मारुन विकलं जातं. ज्यांना थेट राहायला यायचं आहे असे लोकही रंग दिलेलं घर पाहून आनंदाने राहायला येतात आणि पावसाळ्यात त्यांच्या आनंदावर विरजन पडतं. कारण पावसाळ्या या रंगाची वरवरची मलमपट्टी खराब होऊन घराची खराब स्थिती पाहावी लागते. बिल्डर अधिक नफ्यासाठी रंग देऊन काम चालून नेतात. मात्र, पाऊस झाला की घर गळाया सुरुवात होते. छतातून पाणी टिपकतं, भिंती पाझरतात. अशा एक ना अनेक अडचणींमुळे मनस्ताप सहन करावा लागतो. म्हणूनच हे सर्व टाळण्यासाठी मान्सून काळात घर खरेदी केल्यास हे सर्व टाळता येईल.
3. स्वस्त घर मिळण्याचीही शक्यता
उन्हाळ्यात घर खरेदीची सर्वाधिक मागणी असते. मागणी अधिक असल्याने घरांच्या किमती देखील वाढतात. मात्र, मान्सून काळात ही मागणी खूप कमी होते. त्यामुळे या काळात तुम्ही घर खरेदी करत असाल तर तुम्हाला कमी किमतीत घर मिळू शकतं. तुम्हाला या काळात बार्गेनिंग करुन दर कमी करता येतात आणि अधिक सुविधाही मिळवता येतात. फार मागणी नसल्यानं बिल्डर देखील ग्राहकांच्या मागण्या मान्य करतात.
हेही वाचा :
एसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी घरं विकता येतील : जितेंद्र आव्हाड
यंदा घर खरेदी करणे फायद्याचं की तोट्याचं?
PNB आणि SBI बँकेकडून मालमत्तांचा लिलाव; घर आणि दुकाने स्वस्तामध्ये खरेदी करण्याची नामी संधी
व्हिडीओ पाहा :
Know the benefits of house or land buying in monsoon