…तर शासकीय लाभांना मुकावे लागेल, पॅन-आधार लिंकींगबाबत मोठी बातमी

पॅनकार्डला आधारसोबत लिंक न केल्याने तुम्हाला दंड भरावा लागू शकतो, शिवाय तसे न केल्यास 31 मार्च 2023 च्या नंतर पॅनकार्ड निष्क्रिय होउन तुम्हाला आतापर्यंत मिळत असलेला काही शासकीय सेवांचा लाभदेखील बंद होउ शकतो.

...तर शासकीय लाभांना मुकावे लागेल, पॅन-आधार लिंकींगबाबत मोठी बातमी
पॅनकार्ड
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 10:33 AM

31 मार्च 2023 पर्यंत आधारला पॅनकार्ड (PAN card) लिंक करणे अनिवार्य असल्याच्या सूचना केंद शासनाकडून देण्यात आल्या आहेत. अद्यापपर्यंत ज्यांनी पॅनकार्ड आधारशी (Aadhaar) लिंक केले नसेल अशांना लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विहीत मुदतीत पॅनला आधारशी लिंक न केल्यास कालांतराने पॅनकार्ड निष्क्रिय होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, टॅक्सपेयर्स 500 रुपयांची लेट फी भरुन 30 जून 2022 पर्यंत पॅनला बायोमॅट्रीक आधार सोबत लिंक करु शकतील. त्यानंतर दंड वाढून 1000 रुपये होणार आहे. दरम्यान, जर तुमचे पॅनकार्ड बंद झाले तर तुम्हाला आतापर्यंत मिळत असलेल्या शासकीय सवलतीदेखील (government benefits) त्यासोबत बंद होणार असल्याने लवकरात लवकर पॅनला आधारशी लिंक करणे आवश्‍यक असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, एकाच व्यक्तीला अनेक पॅन वाटप झाले तसेच अनेक व्यक्तींना एकच पॅन दिले गेल्याचे प्राप्तिकर विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर पॅन-आधार इंटरलिंकिंगचा प्रश्न प्रकर्षाने समोर आला आहे.

पॅन आधारशी लिंक न केल्यास या सेवा होतील बंद

30 मार्च रोजीच्या एका निवेदनात, वित्त मंत्रालयाने म्हटले होते की, 31 मार्च 2023 नंतर, ज्या करदात्यांनी त्यांचे आधार नोंदविले नसल्यास त्यांचे पॅन निष्क्रिय होईल आणि आयकर कायदा 1961 अंतर्गत सर्व नियम लागू होतील. CBDT ने एक परिपत्रक जारी केले आहे त्यानुसार, आयकर कायद्याच्या नियम 114AAA मध्ये अशी तरतूद आहे, की जर एखाद्या व्यक्तीचा पॅन निष्क्रिय झाला असेल, तर तो त्याचा वापर करु शकणार नाही, त्याची माहिती देऊन कुठलेही शासकीय वा कायदेशिर काम करु शकणार नाही. कायद्यांतर्गत सर्व परिणामांसाठी संबंधित व्यक्ती जबाबदार राहिल. जर एखादी व्यक्ती आधारशी पॅन लिंक करू शकत नसेल, तर त्याला काही शासकीय सेवादेखील मिळणार नाहीत.

काय होतील परिणाम

1. निष्क्रिय पॅन वापरून व्यक्ती रिटर्न फाइल करू शकणार नाही. 2. प्रलंबित परताव्यांची प्रक्रिया करू शकणार नाही. 3. निष्क्रिय पॅनला प्रलंबित परतावा जारी केला जाणार नाही. 4. दोषपूर्ण रिटर्नच्या बाबतीत प्रलंबित कार्यवाही पॅन निष्क्रिय केल्यानंतर पूर्ण करता येणार नाही. 5. पॅन निष्क्रिय झाल्यास, जास्त दराने कर कापला जाईल.

संबंधित बातम्या

Sri Lanka financial crisis : श्रीलंकेचा पाय आणखी खोलात; शेअर बाजार बंद ठेवण्याचा निर्णय

Petrol diesel price : कच्च्या तेलाचे दर वाढले ; इंधनाच्या दरात कोणतीही वाढ नाही, सलग बाराव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर

पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकार देणार नाही सवलत; आता राज्य सरकारांनी कमी करावा ‘व्हॅट’.. पेट्रोलियम मंत्र्यांनी केले स्पष्ट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.