काय आहे फंड ऑफ फंड्सचा फंडा?; गुंतवणूक कशी कराल?

तुम्ही एकाच म्युच्युअल फंडमध्ये (Mutual funds) गुंतवणूक (Investment) करून अनेक अ‍ॅसेटच्या (Asset) गुंतवणुकीचा फायदा घेऊ इच्छिता का? त्यासाठी कोणता पर्याय उपलब्ध आहेत, त्याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

काय आहे फंड ऑफ फंड्सचा फंडा?; गुंतवणूक कशी कराल?
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 5:30 AM

नवी दिल्ली : तुम्ही एकाच म्युच्युअल फंडमध्ये (Mutual funds) गुंतवणूक (Investment) करून अनेक अ‍ॅसेटच्या (Asset) गुंतवणुकीचा फायदा घेऊ इच्छिता का? त्यासाठी कोणता पर्याय उपलब्ध आहेत, त्याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. कृष्णा गेल्या अनेक दिवसांपासून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहे. मात्र, त्याला विशेष असा काही फायदा झाला नाही. सोनं, शेअर्स, डेट, आंतरराष्ट्रीय शेअर्स आणि बॉण्ड अशा ठिकाणी गुंतवणूक करून कृष्णाला नफा कमवायचा आहे. मग हे स्वत: करायचं म्हणजे वेगवेगळ्या फंडात गुंतवणूक करावी लागेल. मात्र, हे खूपच कठीण आणि वेळ खाणारं काम आहे. अशा वेळी कृष्णाचा मित्र रमेश यानं कृष्णाला एक दिलासादायक माहिती दिली. रमेशनं कृष्णाला फंड ऑफ फंड्स या म्युच्युअल फंडाबद्दल माहिती दिली. फंड ऑफ फंड्स हा एक म्युच्युअल फंडचा प्रकार आहे. या फंडामार्फत थेट सिक्युरिटी, कमोडिटी किंवा बॉण्डमध्ये गुंतवणूक करण्यात येत नाही. मात्र, अशा क्षेत्रात गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यात येते. फंड ऑफ फंड्स मुख्यत: दोन प्रकारचे असतात. एक देशांतर्गत गुंतवणूक करणारे. दुसरा नोंदणीकृत कंपनीमार्फत आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूक करणारे.

तज्ज्ञांच मत काय?

गुंतणुकीनुसार फंड ऑफ फंड्सचे अनेक प्रकार आहेत. सक्रियपणे व्यवस्थापन करणारे इक्विटी फंड ऑफ फंड्स किंवा दुसऱ्या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करणारे मल्टी अॅसेट फंड ऑफ फंड्स. असे अनेक प्रकारचे फंड ऑफ फंड्स गुंतवणूकदारांना समाधान देतात आणि त्यांची किंमतही सतत वाढत जाते, असं अल्‍टरनेटिव इनवेस्‍टमेंट्स, क्वांटम म्युच्युअल फंडचे वरिष्ठ फंड मॅनेजर, चिराग मेहता यांनी म्हटले आहे.

कोणत्या गुंतवणूकदारांनं फंड ऑफ फंड्समध्ये गुंतवणूक करावी ?

गुंतवणूकदारांना स्वत:चा पोर्टफोलिओ तयार करायचा नसल्यास त्यांनी फंड ऑफ फंड्समध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. स्वत:च्या पोर्टफोलिओच्या कटकटीपासून वाचायचं असल्यास तुम्ही फंड ऑफ फंड्समध्ये गुंतवणूक करू शकता. फंड व्यवस्थापकाच्या कौशल्यावर सर्व काही अवलंबून असते, असं याबाबत बोलताना MyWealthGrowth.com चे को-फाउंडर, हर्षद चेतनवाला यांनी सांगितलंय. थोडक्यात काय तर कमी जोखीमीची क्षमता असणाऱ्या लहान गुंतवणुकदारांसाठी फंड ऑफ फंड्स चांगला पर्याय आहे. या फंडाच्या गुंतवणुकीमध्ये विविधता असल्यानं जोखीम कमी होते. त्यामुळे सध्या तज्ज्ञांकडून गुंतवणुकीसाठी फंड ऑफ फंड्सचा सल्ला दिला जात आहे.

संबंधित बातम्या

डिजिटल लोन म्हणजे काय? डिजिटल लोनसाठी अर्ज कसा कराल, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

फायर इन्शुरन्स म्हणजे काय? कोणत्या परिस्थितीमध्ये मिळते नुकसान भरपाई? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Russia-Ukraine Crisis : बियर उद्योगाचे टेन्शन वाढले

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.