EPF आणि PPF मध्ये नेमका काय फरक? दोघांपैकी जास्त Returns कशावर? जाणून घ्या!
जे लोक नोकरी करत नाही त्यांच्यासाठी सरकार ने पब्लिक प्रोविडेंट फंड आणले होते. या योजनेचा लाभ कोणताही भारतीय नागरिक घेऊ शकतो. हल्ली पी पी एफ वर 7.1 टक्के व्याज दर मिळत आहे.
पैसा नेमका कुठे गुंतवायचा, याबद्दल आपल्यापैकी अनेकांना फारशी माहिती नसते. बहुतेक वेळा गुंतवणूक करत असताना ज्या काही रिटर्न्स असतात, त्याच्या बद्दल अनेकांना माहिती नसते. उदाहरणार्थ ईपीएफ, पीपीएफ यासारख्या योजना देखील असतात. या दोन्ही योजनांची नावे एकसारखी असल्यामुळे अनेक ग्राहकांचा गोंधळ उडून जातो. परंतु ह्या दोन्हीही योजना पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. ईपीएफला एंप्लॉयी प्रोविडेंट फंड (Employee Provident Fund) असे म्हणतात. त्याचबरोबर पीपीएफला पब्लिक प्रोविडेंट फंड (Public Provident Fund) असे म्हटले जाते. जर एखादी व्यक्ती नोकरी करत असेल आणि कंपनी ईपीएफओ (EPF Act) एक्ट अंतर्गत रजिस्टर्ड असेल, तर त्याच्या पगारातून प्रत्येक महिन्याला काही रक्कम ही प्रोविडेंट फंड मध्ये जमा होते. जर एखाद्या कंपनीमध्ये 20 पेक्षा जास्त लोक काम करत असतील तर अशा ठिकाणी हा कायदा लागू करणे अत्यंत गरजेचे ठरते.
जर एखाद्या व्यक्तीची बेसिक सॅलरी 15 हजार रूपये पेक्षा कमी असेल तर त्याच्यासाठी एंप्लॉयी प्रोविडेंट फंड मध्ये ठराविक रक्कम जमा करावी लागते. कमी पगार असणाऱ्या लोकांना हे अनिवार्य नाही परंतु प्रॉव्हिडंट फंड च्या मदतीने तुम्हाला भविष्यात मदत मिळते. प्रत्येक महिन्याला तुमच्या सॅलरीतून ठरावीक रक्कम खात्यामध्ये जमा केली जाते. काही ठराविक भाग कर्मचाऱ्यांकडून देखील जमा केला जातो.आपण जमा केलेल्या रकमेवर सरकार व्याज मिळवते अशा प्रकारेच तुमचे पेन्शन फंड तयार होते, याच्या मदतीने लॉंग टर्म वेल्थ निर्माण केले जाऊ शकते.
टॅक्सवर देखील मिळते सवलत
ईपीएफ मध्ये गुंतवणूक केल्यावर आपल्याला टॅक्स मध्ये देखील आपल्याला सवलत मिळते. गुंतवणूक केल्यावर सेक्शन 80सी अंतर्गत डिडक्शनचा लाभ मिळतो. याशिवाय तुमचे पुर्ण इन्वेस्टमेंट टॅक्स देखील मोफत होतो .ईपीएफओ मध्ये गॅरंटी रिटर्न मिळते. नुकतेच EPFO बोर्ड ने आर्थिक वर्ष 2021-22 साठी 8.1 टक्के व्याज दर देण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या आर्थिक वर्ष हा दर 8.5 इतका होता.
सेल्फ एंप्लॉयडसाठी PPF पर्याय
जे लोक नोकरी करत नाही त्यांच्यासाठी सरकारने पब्लिक प्रोविडेंट फंड योजना आणली होती. या योजनेचा लाभ कोणताही भारतीय नागरिक घेऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये PPF वर 7.1 टक्के व्याज दर मिळत आहे. व्याजदराचा निर्णय एक महिना किंवा तीन महिन्याच्या आधारावर घेतला जातो. ईपीएफओ मध्ये वर्षभराच्या आधारावर व्याज दर ठरवला जातो. हे खाते कोणतेही बँक पोस्ट ऑफिस मध्ये उघडले जाऊ शकते. हे खाते उघडण्यासाठी आपल्याला कमीत कमी 500 रुपये किंवा जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करावे लागतात.त्या किंमतीवर लॉक-इन पीरियड 15 वर्षाचा असतो. जर तुम्हाला काही अडचण आल्यास अशा वेळी तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम काढून देखिल शकता.
संबंधित बातम्या :
Credit score म्हणजे काय रे भाऊ? खराब क्रेडिट स्कोरचे तोटे समजून घ्या
जेवढी रिस्क तेवढा अधिक परतावा; गुंतवणुकीचा कोणता मार्ग सुरक्षीत? जाणून घ्या
Bank of Baroda देतीये स्वस्तात घर खरेदीची संधी; 24 मार्चला बँकेकडून गहान संपत्तीचा लिलाव