Know this | तुम्हाला हे माहितीये का? विधवा आईचा मयत मुलाच्या संपत्तीवर अधिकार
कोरोना ने आपली हक्काची माणसे हिरावून घेतली तर त्यानंतर अनेक मालमत्ता आणि जागेचे वाद पुढे आलेत. मयत कमावत्या मुलाचा कोविड कारणामुळे मृत्यू झाला असेल किंवा तो मयत झाला असेल तर त्याच्या संपत्तीवर सर्वात अगोदर कायदेशीर हक्क कोणाचा? मयत मुलाच्या संपत्तीवर विधवा आई हक्क सांगू शकते काय ? हा प्रश्न उभा ठाकतो. यासंबंधी कायदा काय म्हणतो हे जाणून घेऊयात
विधवा आईला एक मुलगा (Son) आणि एक मुलगी (Daughter) आहे. मुलाचं लग्न (Married) झालेलं असून त्याला अपत्य नाही आणि तो स्वतंत्ररीत्या त्याच्या मिळकतीत राहत असेल. कोविड-19 महामारीत (Covid-19 Pandemic) या आईने आपला मुलगा आणि सून यांना गमावलं असेल तर त्याच्या मालमत्तेवर विधवा आईला (Widow Mother) हक्क सांगता येतो का? कायदा (Law) काय सांगतो ते समजून घेऊ .
कायदा काय सांगतो?
कोविड महामारीत निधन झालेल्या मुलाने इच्छापत्र तयार केलेले नसेल अशा परिस्थितीत त्याच्या मालमत्तेचा ताबा आईला कसा मिळवता येईल याविषयी कायद्यात तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 यामधील तरतुदीनुसार आईला मुलाच्या संपत्तीवर हक्क सांगता येतो आणि ती या संपत्तीची कायदेशीर वारसदार होऊ शकते. सून आणि मुला मुलगा दाखवल्यानंतर विधवा आई हीच या प्रकरणात कायदेशीर वारस ठरते. तिला कायद्याने उत्तराधिकारीचा हक्क मिळतो. मालमत्तेचे कार्यक्षेत्र असलेल्या संबंधित न्यायालयाकडून आई हे ताबा पत्र मिळू शकते.
मालमत्तेवर दावा करता येऊ शकेल?
सदर मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी अथवा नावावर करण्यासाठी सर्वप्रथम या मालमत्ते संबंधातील कागदपत्रे संबंधित यंत्रणेसमोर सादर करणे गरजेचे आहे. यामध्ये मालमत्तेचे हक्क पत्र, नोंदणीपत्र, या मालमत्तेची संबंधित गॅस जोडणी नळजोडणी मालमत्तेशी संबंधित रजिस्ट्री, मालमत्ता कराच्या पावत्या, विजेचे बील टेलीफोन बील इत्यादी कागदपत्रांचा समावेश असतो. ही कागदपत्रे संबंधित मालमत्तेच्या मालकाची माहिती अधोरेखित करतात. त्यानंतर ही संपत्ती या कागदपत्रांच्या आधारे आईच्या नावावर हस्तांतरित करता येऊ शकते.
मुलाच्या नावावरील संपत्ती आईच्या नावावर करण्यासाठी जमीन महसूल नोंदणी संबंधित कार्यालय तसेच या घराच्या मालकाचे नाव बदलण्यासाठी संबंधित पालिका, महापालिका येथील दप्तरी नोंद बदलावी लागते. कागदपत्रांच्या आधारे ही प्रक्रिया पूर्ण करता येते. यासाठी संबंधित वारसदाराने वकिलाचा अथवा माहितीगाराची मदत घ्यावी.
न्यायालयात दाद मागणं शक्य
या प्रक्रियेत कोणी कायदेशीर अडथळा आणल्यास त्या विरोधात विधवा आईला संबंधित न्यायालयात दाद मागता येते. हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 मधील तरतुदीनुसार मयत मुलाच्या संपत्तीत आई ही कायदेशीर वारस असते. मुलगा आणि सून विना अपत्य मयत झाल्यास आईच कायदेशीर वारस असते. त्यामुळे अशा काही कायदेशीर अडचणी उद्भवल्यास त्याविरोधात न्यायालयात दाद मागता येते.